Shruti Marathe | एकेकाळी साऊथमध्ये काम केल्यामुळे मराठीमध्ये नव्हते मिळत काम; अभिनेत्री श्रुती मराठेने सांगितले इंडस्ट्रीमधील अनुभव

पोलीसनामा ऑनलाइन – सुंदर आणि उत्तम अभिनाय करणारी मराठी अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) हिने आता मराठी सिनेविश्वात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. आज श्रुतीचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. अनेक चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली आहे. श्रुतीचे गणपतीमधील ढोल वादनाचेही अनेक लोक चाहते आहेत. मात्र आता लोकप्रिय असलेली श्रुती मराठे (Shruti Marathe) हिचा देखील एक खडतर प्रवास आहे. इंटस्ट्रीमध्ये काम मिळवणे एकेकाळी तिच्यासाठी खूप अवघड गोष्ट झाली होती. अभिनेत्री श्रुती मराठेने तिचा हा प्रवास आता मांडला आहे.

 

एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री श्रुती मराठेला तिच्या करिअर विषयी प्रश्न विचारण्यात आले. श्रुतीने तिचा प्रवास उलघडून सांगताना तिला आलेले अनुभव देखील शेअर केले आहे. अभिनेत्री श्रुती हिने फक्त मराठीमध्ये नाही तर दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात काम केले आहे. मात्र या इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे श्रुतीला मराठीमध्ये काम मिळत नव्हतं. मराठीमध्ये तिचा सनई चौघडे (Sanai Choughade) हा सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमा बऱ्यापैकी चाललाही मात्र यामुळे श्रुतीला पाहिजे तसा फायदा झाला नाही. या चित्रपटानंतरही ती मराठीमध्ये काम मिळवण्यासाठी धडपड करत होती. त्यानंतर ती दाक्षिणात्य सिनेविश्वात काम करु लागली.

 

अभिनेत्री श्रुती मराठेने आपला मोर्चा साऊथमध्ये वळवल्यानंतर श्रुतीचं मराठीतलं काम पूर्णपणे बंद झालं होतं. कामामुळे साऊथमध्ये श्रुतीची लोकप्रियता वाढत होती. मात्र, भाषेची अडचण तिला येत असल्यामुळे तिला त्या इंडस्ट्रीमध्ये मिसळून घेता येत नव्हते. आणि याच काळात तिचे मराठीचे दरवाजेही बंद झाले.

 

पुढे तिने सांगतिले की साऊथमध्ये मन न रमल्यामुळे ती पुन्हा मराठी सिनेसृष्टीत काम मिळवण्याचा प्रयत्न करत होती.
मात्र येथे वेगळाच एक गोंधळ झाला. (South Cinema) आता श्रुती साऊथमध्ये काम करते त्यामुळे तिला मराठी कलाविश्वात इंटरेस्ट नाही
असे परस्पर ठरवत लोकांनी तिला ऑफर देण बंद केलं. यामुळे तिच्या पुढील अडचणीत वाढ झाली.
इकडेही काम नाही आणि तिकडचे काम सोडलेले अशी अवस्था श्रुतीची झाली होती.

 

मराठीमध्ये काम मिळवण्यासाठी अभिनेत्री श्रुती मराठे पुन्हा हात पाय मारू लागली. चित्रपट केल्यानंतरही तिचे स्ट्रगल चालू होते. त्यानंतर तिच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा प्रोजेक्ट तिच्याकडे आला. हा प्रोजेक्ट तिच्या करिअर मधला टर्निंग पॉईट ठरला. छोट्या पडद्यावरील तिची लोकप्रिय मालिका राधा ही बावरी (Radha Hi Bavari) या मालिकेमध्ये महत्त्वाचे पात्र साकारण्याची संधी श्रुती मराठेला मिळाली. (Marathi Serial) या संधीचे सोने करत श्रुतीने आपले पाय मराठी विश्वात घट्ट रोवले. या मालिकेमुळे श्रुती घराघरात पोहचली. या मालिकेनंतर तिला मराठीमध्ये कामे मिळू लागले.

 

आज श्रुती मराठेचा (Shruti Marathe) मोठा चाहता वर्ग आहे. तिचे मुंबई पुणे मुंबई 2 (Mumbai Pune Mumbai 2),
बंध नायलॉनचे (Bandh Nylonche), रमा माधव (Rama Madhav) हे सिनेमे गाजले आहेत.
मराठीसह श्रुतीने दाक्षिणात्य सिनेविश्वात काम केले.
तिने 4 तमिळ आणि 1 कन्नड सिनेमा केला आहे. अनेक तरुण तरुणींची श्रुती मराठे ही आवडती अभिनेत्री आहे.

 

 

 

Web Title :  Shruti Marathe | marathi actress shruti marathe struggle story

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा