Side Effects Of Wearing Pearl | ‘या’ लोकांनी मोती घालू नये, नाहीतर पैशांसह आरोग्यावरही होईल वाईट परिणाम

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Side Effects Of Wearing Pearl | आधुनिक जगात म्हणजेच वैज्ञानिक जगात वावरत असताना आपण पाहतो की, अनेक लोकं अजूनही काही जुण्या रूढी आणि परंपरा पाळत व मानत आहेत. त्यातील एक म्हणजे भविष्य. काहीजण आपली जन्मकुंडली एखाद्या ज्योतिषला दाखवून त्याने दिलेले सल्लेही मान्य करत असतात. जर एखादा व्यक्ती खूपच चंचल वृत्तीचा असेल, आणि तसेच त्याला खूप रागही येत असेल. तर अशा व्यक्तींना ज्योतिष आपल्या हातात मोती (Pearl) घालण्यासाठी देतात. परंतू हाच मोती एखाद्या चुकीच्या राशीच्या व्यक्तीने घातला, तर त्याच्यावर त्याचे खूप वाईट परिणामही होतात. (Side Effects Of Wearing Pearl)

 

तर आज आम्ही तुम्हाला कोणत्या राशीच्या व्यक्तींना मोती आपल्या हातात घालू नये, याविषयी माहिती देणार आहोत. (Side Effect Of Wearing Pearl)

 

1. वृषभ (Taurus)
वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मोती घालू नये. घातला तर अर्थिक नुकसानाला (Financial Loss) सामोरं जावं लागेल.

 

2. मिथुन (Gemini)
मिथुन राशीचा स्वामी बुध असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांनीही मोती घालू नये. जर घातल्यास त्या व्यक्तींच्या आरोग्यावर वाईट परिणाम (Bad Health Effects) होऊ शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तींचं आपल्या ध्येयापासूनही लक्षही भरकटू शकतं.

 

3. सिंह (Lion)
या राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्र बाराव्या स्थानचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी मोती हा घातक ठरू शकतो. जर या व्यक्तींनी मोती घातला तर, त्यांच्या वैवाहिक संबंधांवरही (Marital Relation) वाईट परिणाम होऊ शकतो.

4. धनु (Sagittarius)
धनु राशीचा स्वामी बृहस्पती गृह आहे. या राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्र आठव्या घराचा स्वामी असतो. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनीही मोती घालू नये.
कारण त्यामुळे त्या व्यक्तींना आरोग्याच्या समस्या (Health Problem) आणि त्याचबरोबर बिजनेसमध्येही नुकसान (Loss In Business) होऊ शकतं.

 

5. कुंभ (Aquarius)
या राशीचे स्वामी शनि देव (Shani Dev) असल्यामुळे या राशीच्या लोकांनाही मोती घालू नये.
कारण या राशीवाल्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये चंद्र आठव्या स्थानावर असतो.
जर या राशीच्या व्यक्तीनी मोती घातला तर त्या व्यक्तीच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
त्याचबरोबर त्याला एखाद्या दुर्घटनेलाही सामोरं जावं लागू शकतं. तसेच या व्यक्तीचे शत्रूही जास्त सक्रिय होतात.

 

टीप :- सदरील लेखामध्ये दिलेल्या माहितीवरून आम्ही कुठलाही दावा करत नाही. विविध माध्यमांतून / ज्योतिष / पंचांग / प्रवचने / धर्म ग्रथांमधून संग्रहित करून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहचवली जात आहे. आमचा उद्देश केवळ सुचना आणि माहिती पोहचविणे आहे. ही माहिती केवळ सुचना म्हणून घ्यावी. त्याव्यतिरिक्त याचा अवलंब स्वतःच्या जिम्मेदारीवर करावा.

 

Web Title :- Side Effects Of Wearing Pearl | moti side effects these people or zodiac sign never wear pearls

 

#मोतीचे नुकसान #या लोकांना घालू नये मोती #Spiritual #Religion #Moti #Pearl Disadvantage #Who Should Not Wear Pearl #Pearl Stone #Lifestyle and Relationship #Spirituality #Religion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO | होळीच्या अगोदर कर्मचार्‍यांना मिळू शकते भेट, PF वर मिळेल जास्त व्याज – 12 मार्चला होणार निर्णय

 

Pune Crime | पुण्यात चोर पोलिसात थरार ! ATM फोडणार्‍या चोरट्यांकडून पोलिसांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न, दोघांना अटक; हडपसरमधील पहाटेची घटना

 

Pune Crime | प्रकल्पाच्या आराखड्यात परस्पर बदल करून फसवणूक ! अशोक भंडारी, राजन रायसोनी, सिध्दांत कोठारी, अमान उर्फ अरमान कोठारीसह 6 जणांविरूध्द 1.45 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल