Bigg Boss 13 चा विनर सिद्धार्थ शुक्लाचा डिजिटल डेब्यू ! एकता कपूरच्या ‘या’ वेब सीरिजमध्ये झळकणार (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विनर सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा झाली आहे. लवकरच तो एकता कपूर (Ekta Kapoor) च्या वेब सीरिज शोमध्ये काम झळकणार आहे. एकता कपूरनं शोचं टायटल ट्रॅक रिलीज केलं आहे. यात तिनं मेन लिड म्हणजे सिद्धार्थ शुक्ला आणि सोनिया राठी (Sonia Rathee) हिला इंट्रोड्युस केलं आहे.

एकता कपूरचा फेमस वेब सीरिज शो ब्रोकन बट ब्यूटिफुल सीजन 3 (Broken But Beautiful Season 3) मध्ये सिद्धार्थ शुक्ला दिसणार आहे. सोनिया राठी यात फीमेल लिड साकारत आहे. लवकरच याची शूटिंग सुरू होणार असल्याचंही एकतानंही सांगितलं आहे.

एकतानं शेअर केलेलं शोचं टायटल ट्रॅक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

या वेब सीरिजच्या पहिल्या दोन सीजनमध्ये विक्रांत मेसी (Vikrant Massey) आणि हरलीन सेठी (Harleen Sethi) लिड रोलमध्ये होते. ही सीरिज लोकांना खूप आवडली होती. दोघांची अ‍ॅक्टिंग आणि केमेस्ट्री यांची खूप चर्चा होताना दिसली होती.

You might also like