अनुप जलोटा यांची ‘ही’ गर्लफ्रेंड पाहिली का?

गोवा : वृत्तसंस्था

‘ऐसी लागी लगन’ या भजनाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा यांनी ‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वाच्या सोहळ्यात एक गौप्यस्फोट केला आहे. अनुप जलोटा यानी आपल्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांच्या या खुलाशामुळे प्रक्षकांची नजर आता अनुप आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीन या जोडीवर असणार हे नक्की…

‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस’चा यंदाचा सीजन ‘विचित्र जोडी’ या थीमवर आधारित आहे. मात्र बिग बॉसचा सोहळा गाजला तो प्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा यांच्यामुळे. जलोटा यांनी त्यांच्या एका गर्लफ्रेंडबाबत खुलासा केला आहे. अनुप जलोटा यांनी ‘ऐसी लागी लगन’ हे भजन गातच स्टेजवर एंट्री केली. त्यानंतर एक व्हिडिओ प्ले करण्यात आला. त्यात अनुप-जसलीन एकत्र दिसले. या व्हिडिओद्वारे त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली.

अनुप यांनी आपल्या नात्याबद्दल ‘बिग बॉस’- १२ च्या घरात खुलासा केला. तेव्हा आम्हाला नेहमीच लपून भेटावं लागायचं, असा खुलासाही जसलीननं केला. अनुप जलोटा यांच्यासोबत मागच्या तीन वर्षांपासून आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं जसलीनने शो सुरू होण्या आगोदर एका वृत्तपत्राकडे स्पष्ट केले आहे. या नात्याविषयी घरच्यांना माहीत असल्याचंही तिने सांगितलं.

जसलीन म्हणते आमच्या दोघांच्या नात्यात वयाची कधीच अडचण आली नाही. जसलीन देखील गायिका असून तिने अनुप जलोटा यांच्याकडूनच गायनाचे धडे घेतले आहेत.अनुप यांनी बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी हे गुपित उघड केल्याने त्यांचे सर्व चाहते अवाक् झाले आहेत. या आधी हे नातं लपवताना या बातम्या म्हणजे अफवा असल्याचं दोघांकडूनही स्पष्ट केलं जायचं. आपल्या रिलेशनशिपबद्दल अचानक केलेल्या या खुलाश्यामुळे प्रेक्षकांची नजर अनुप-जसलीन या जोडीवर असणार आहे हे नक्की…