Sinhagad Road Accident News | सुट्टीच्या दिवशी सिंहगड घाटामध्ये वाहतुक कोंडी आणि अपघात…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sinhagad Road Accident News | सिंहगड किल्ला हे पुण्याजवळीला सर्व पर्यटकांसाठी हक्काचे पर्यटन स्थळ आहे. येथील निसर्गरम्य वातावरणामुळे शनिवारी-रविवारी पर्यटकांची खूप गर्दी झालेली बघायला मिळते. यामुळे सिंहगड व खडकवासला (Khadakwasla) परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले असून, पुणे- पानशेत रस्त्यावर (Pune Panshet Road) पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे, मात्र तरी सिंहगड घाट परिसरात अपघात होत आहेत.

रविवारी (दि.२१) घाट रस्त्यावरील गोळेवाडी टोल नाक्याजवळ (Golewadi Toll Plaza) मोटारीची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार पर्यटक गंभीर झाला. सिंहगड वनविभागाचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे (Balasaheb Jivde), संदीप कोळी (Sandeep Koli), नितीन गोळे (Nitin Gole) व सुरक्षा रक्षकांनी जखमी पर्यटकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

सुट्टीच्या दिवशी दिवसभरात गडावर पर्यटकांची (Tourists) चारचाकी 353 व दुचाकी 556 वाहने आल्याची नोंद झाली.
दुपारी बाराच्या सुमारास गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्यामुळे थेट घाट रस्त्यावर वाहनांच्या लांब
रांगा लागल्याने काही वेळ वाहतूक कोंडी (Traffic) झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरक्षारक्षकांना कोंढापूर फाट्यापासून वाहनतळापर्यंत धावपळ करावी लागली. गेल्या रविवारच्या तुलनेत आज पर्यटकांची संख्या अधिक होती. सायंकाळी पुण्याकडे (Pune) जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. (Sinhagad Road Accident News)

Web Title :  Sinhagad Road Accident News | sinhagad-ghat-road-accident-one injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘आमचा 19 आकडा कायम राहील, पण…’, ठाकरे गटाने स्पष्टच सांगितलं

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – पूर्व वैमनस्यातून आंबेगावातील सोसायटीमध्ये गुंडांचा धुडगुस; महिला जखमी

Sameer Wankhede | अतिक अहमदसारखं माझ्यासोबत घडू शकतं, समीर वानखेडेंनी केली ‘ही’ मागणी