निर्मला सीतारमण यांनी RBI डायरेक्टर्स बैठकीला केलं संबोधित; म्हणाल्या…

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) केंद्रीय बोर्डाला संबोधित केलं. यामध्ये त्यांनी सरकारची प्राथमिकता कशाला आहे, हे सांगितले. या बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 च्या मुख्य बिंदूंची रूपरेखा आणि त्यासंबंधी विषयावर चर्चा झाली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आरबीआय बोर्डाची ही पहिलीच बैठक होती. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली.

परंपरेनुसार, दरवर्षी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री आरबीआय किंवा बाजार नियामक भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (SEBI)च्या सदस्यांसोबत बैठक घेतात. आरबीआयने जारी केलेल्या एका वक्तव्यावर सांगितले, की अर्थमंत्र्यांनी आरबीआय केंद्रीय बोर्डाच्या 587 व्या बैठकीला संबोधित केले आहे. या बैठकीत अर्थमंत्र्यांनी बजेटमधील महत्वाच्या बाबी आणि सरकारच्या प्राथमिकेबाबत सांगितले आहे.

अशा केल्यात सूचना

बोर्डाच्या सदस्यांनी अनेक सूचना दिल्या. बोर्डाने बैठकीत सध्याची आर्थिक स्थिती, जागतिक आणि देशांतर्गत आव्हाने आणि रिझर्व्ह बँकेच्या संचालनाच्या विविध क्षेत्रांची समीक्षा केली. त्यानुसार, बँकांमध्ये तक्रार कक्षाला मजबूत करण्याच्या पर्यायांचा समावेश असेल.

आरबीआय गर्व्हनर यांच्यासह अनेकांची उपस्थिती

आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर, अर्थ सचिव अजय भूषण पांडे आणि कांत पांडे देवाशीष पांडा यांच्यासह आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांचाही समावेश या बैठकीत होता.