Skin Care Tips | चेहर्‍याचे डाग आणि डार्क सर्कल दूर करेल ‘हे’ जेल, नितळ आणि चमकदार होईल फेस; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात, सूर्यप्रकाशामुळे त्वचा खराब होते, ज्यामुळे डाग आणि काळ्या वर्तुळाची समस्या उद्भवू शकते (Skin Care Tips). पण तुम्हाला माहित आहे का की फक्त कोरफडीच्या वापराने या दोन्ही समस्यांवर उपचार करता येतो (Aloe Vera For Skin Care). महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा कोरफडीचा वापर जास्त फायदेशीर आहे आणि चेहर्‍याला डागरहित आणि चमकणारा लुक देतो (Skin Care Tips). डाग आणि काळी वर्तुळे दूर करण्यासाठी कोरफडीचा वापर कसा करावा ते जाणून घेवूयात (Aloe Vera Gel To Remove Dark Circles, Dark Spots And Wrinkles).

 

Aloe Vera Benefits : डाग आणि काळी वर्तुळे दूर करण्यासाठी असा करा कोरफडीचा वापर

1. त्वचा घट्ट करण्यासाठी (To Tighten The Skin)
जेव्हा त्वचा सैल होऊ लागते तेव्हा चेहरा आणि त्वचेवर बारीक रेषा दिसू लागतात. पण रात्री कोरफडीच्या जेलने मसाज केल्यास त्वचा घट्ट होईल आणि बारीक रेषा कमी होतील. यासोबतच त्वचा मुलायम आणि चमकदारही होईल (Skin Care Tips).

 

2. कमी वयात वृद्ध दिसू नये म्हणून (For Anti Aging)
जर लहान वयातच चेहर्‍यावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर तुम्ही कोरफडीच्या सहाय्याने अँटी-एजिंग मास्क बनवू शकता. एलोवेरा जेलमध्ये असलेले व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन-सी त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचा तरुण होते (Know Anti Aging Tips).

 

1 चमचा एलोवेरा जेल, 1 चमचा मध आणि 1 चमचा गुलाबजल मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर आणि मानेवर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. कोरफडीचा मास्क सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

3. डार्क सर्कल घालवा (Removes Dark Circles)
तुम्ही एलोवेरा जेलच्या मदतीने काळी वर्तुळे देखील दूर करू शकता. यासाठी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचे जेल डार्क सर्कलवर लावावे लागेल.
दुसर्‍या दिवशी सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहर्‍याचा पफीनेस, आय बॅग्ज आणि डाग सुद्धा कमी होतील.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Skin Care Tips | skin care tips aloe vera gel to remove dark circles dark spots and wrinkles know anti aging tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes | वैयक्तिक नातेसंबंधात अडथळा बनू शकतो ‘हा’ आजार, खाणे-पिण्याची घ्या विशेष काळजी

 

Wrinkle Removing Tips | झोपताना चेहर्‍यावर लावा ‘हे’ तेल, सुरकुत्यांपासून होईल सुटका; जाणून घ्या पध्दत

 

Health Tips | चहासोबत कधीही खाऊ नका या 5 वस्तू, मागे लागतील आजार, जाणून घ्या कोणत्या