मिस इंडिया कन्टेस्टंट राहिल्या स्मृती इराणी; मिका सिंगच्या गाण्यात दिसल्या, तुम्ही ओळखलं का?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नेते पदी विराजमान असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या जीवनात आजची एक विशेष संधी आहे. आज २३ मार्च रोजी स्मृती इराणी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. झगमगत्या दुनिया ते राजकीय क्षेत्र यामध्ये स्मृती इराणी यांनी आपली क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पाहुयात त्यांचे थ्रोबॅक व्हिडीओज ज्यात तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाहीत.

स्मृती इराणी यांनी वयाच्या २१ व्या वर्षी फेमिना मिस इंडिया(१९९८) मधील सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. या थ्रोबॅक व्हिडिओमध्ये नाजूक उंच असलेल्या स्मृती संपूर्ण आत्मविश्वासासोबत वॉक करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये स्मृती सांगत आहेत की त्यांनी इंग्रजी लिटरेचरमध्ये डिग्री घेतली आहे आणि त्यांना स्पोर्ट्स अडव्हेंचर्स या गोष्टी आवडतात. यासोबतच त्यांनी राजकारणातील आवडीचा उल्लेख केला होता.

मिका सिंग सोबत ‘या’ गाण्यात दिसल्या स्मृती इराणी
ब्युटी पेजेंटमध्ये भाग घेतल्यानंतर स्मृती इराणी यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. मालिकेत येण्याआधी त्या गायक मिका सिंग यांचा एक म्युजिक व्हिडीओ ‘बोलीयां’ मध्ये दिसल्या. या व्हिडिओमध्ये त्या गोल्डन आऊटफिटमध्ये दिसू शकतात. आज स्मृतींना पहा आणि त्यांची जुनी छायाचित्रे अथवा व्हिडीओ पाहिल्यास त्यांच्यात खूपच फरक आहे. जुन्या फोटोंमध्ये स्मृती यांना ओळखणे फार कठीण आहे.

क्योंकी…तुलसीने दाखवली कीर्ती
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या महिलेतील तुलसी विराणीच्या भूमिकेमुळे स्मृती इराणी या बऱ्याच प्रसिद्ध झाल्या, हे सर्वांनाच माहिती आहे. वर्षानुवर्षे त्या तुलसी म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांना ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ साठी इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी ऑवार्ड, इंडियन टेली ऑवार्ड आणि स्टार परिवार ऑवार्ड मिळाला आहे.