…म्हणून पतीनं पत्नीला पाजलं सॅनिटायजर

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – कौटुंबिक वादातून पती-पत्नीत झालेल्या भांडणानंतर पतीने गळा दाबून पत्नीला जबरदस्तीने सॅनिटायजर Sanitizer पाजले. निजामाबादच्या बुुरुड गल्ली येथे ही 22 मे रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

गुरुनामसिंग जमदार असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, पायलकौर गुरनामसिंग जमदार या विवाहितेचे सासर बुरुड गल्ली येथे आहे. 22 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पती गुरनामसिंग याच्यासोबत तिचे भांडण झाले होते. याच भांडणातून गुरनामसिंग याने पायलकौर यांचा एका हाताने गळा दाबून दुसऱ्या हाताने त्यांना जबरदस्तीने सॅनिटायजर Sanitizer पाजले. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. 25 रोजी त्यांना शुद्धीवर आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याात तक्रार दिली आहे.

त्यावरून गुरनामसिंग याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर, निजामाबाद येथे गुन्हा वर्ग केला आहे.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी