Society Maintenance । सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील सर्व सदनिकाधारकांना एकसमान मेंटेनन्स

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Society Maintenance । सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील (Co-Operative Housing Society) फ्लॅट्सचे (सदनिका) क्षेत्रफळ कितीही असले तरी सर्व सभासदांना समान मासिक सेवा शुल्क (Society Maintenance) आकारण्यात यावा, याबाबत आदेश सहकार विभागाने याअगोदरच जाहीर केला होता. तर, या आदेशात अजून कुठलाही बदल केला नाही. असं सहकार विभागाने सांगितलं आहे. म्हणून गृहनिर्माण सोसायटीतील वन-बीएचके (One-BHK), टू-बीएचके (Two-BHK) असो की थ्री-बीएचके (Three-BHK) फ्लॅटसधारकांना (Flat holder) सामान मासिक सेवा शुल्क (मेंटेनन्स) करण्यात येणार असल्याचं सहकार विभागाने म्हटलं आहे.

तर, काही गृहनिर्माण सोसायटीत काही सभासद मासिक सेवा शुल्क (मेंटेनन्स) संदर्भात गोंधळ निर्माण करत असतात.
तसेच, काही सोसायटीत वन-बीएचके फ्लॅट्सधारक हे टू-बीएचके, थ्री-बीएचके फ्लॅट्सधारकापेक्षा कमी मेंटेनन्स असल्याची तुलना केल्याने यावरून कमिटी आणि काही सभासदांमध्ये अडचणी निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.
तसेच, येथील सातारा रस्ता भागात अरण्येश्वर मधील ट्रेझर पार्क अपार्टमेंट संदर्भात क्षेत्रफळानुसार मेंटेनन्स आकारण्यात यावा, याबाबत निर्णय जिल्हा उपनिबंधक शहर कार्यालयाने घेतला.
तर हा निर्णय फक्त अपार्टमेंटबाबत असून, सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांबाबत (Housing Society) नसल्याचं सहकार विभागाने सांगितलं आहे.

फ्लॅट्सधारकांमध्ये (Flat holder) गोंधळाची स्थिती समोर राहू नये.
यावरून 29 एप्रिल 2000 रोजी याबाबत आदेश काढला होता.
तर फ्लॅट्सचा दर आणि क्षेत्रफळ कितीही असले तरी सफाई (Housekeeping), रखवालदार (Security), क्रीडांगण (Playground), लिफ्ट आणि कार्यालयीन या विषयावरून खर्च या सुविधा सर्व सभासदांना सामान पद्धतीने द्याव्या लागणार आहे.
म्हणून, फ्लॅट्सच्या दराशी मेंटेनन्स जोडणे तर्कसंगत आणि योग्य होणार नसल्याचं मत अनेक गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, सभासद आणि मुंबई (Mumbai), पुणे (Pune) जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ, (District Co-operative Housing Federation,) आणि उपलोकायुक्त यांनी राज्य शासनाकडे मांडलेत.
यावरून सोसायट्यांनी निवासी फ्लॅटस आणि व्यापारी गाळ्यांना सम मेंटेनन्स लागू राहील.
तेच लागू केलेल्या आदेश आजही लागू आहेत.
असं माहिती सहकार उपनिबंधक दिग्विजय राठोड (Deputy Registrar Digvijay Rathore) यांनी दली आहे.

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन (President Suhas Patwardhan) म्हणाले, ज्या सोसायटीत सभासद नियमित मेंटेनन्स भरतात, अशा ठिकाणी आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे कमिटीला शक्य होते.
मात्र, काही सभासद समान मासिक सेवा शुल्क (Maintenance) नियमितपणे भरत नाहीत.
अशाबरोबर सुविधा उपलब्ध करून देण्यास अडचणी निर्माण होतात.
अशा थकबाकीदार सभासदांना 2 नोटीस पाठवून पूर्वकल्पना दिल्या जातात.
यानंतर शेवट कायदेशीर सूचना पाठवून उपनिबंधक कार्यालयाला कळवून याबाबत फ्लॅट्सधारकावर कारवाई करण्यात येते. असं त्यांनी सांगितलं आहे.

Web Title : Society Maintenance | maintenance is the same for all in housing societies

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Maharashtra Cabinet Expansion | राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे ; काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना डच्चू?

CM Uddhav Thackeray | काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवरून मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला टोला; म्हणाले…

Pimpri Crime | सेट्रींगचे काम करताना चौथ्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यु