मोदी सरकारनं सरकारी नोकरदारांच्या ‘परफॉर्मन्स अपरायझल’साठी लागू केला ‘SPARROW’, जाणून घ्या ते काय आहे आणि कोणतं काम करतं

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारी काम आणि दहा महिने थांब अशी म्हण आपल्याकडे आहे. त्यातूनच भ्रष्टाचार वाढत जातो आणि लोकांनी आपले काम पूर्ण करुन घेण्यासाठी लाच द्यावी, अशी परिस्थिती सरकारी कर्मचारी निर्माण करतात. त्यावर तसेच काम चोर कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी स्पॅरो हे सॉफ्टवेअर उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यात काम करण्याचा आदेश मोदी सरकारने दिला आहे.

मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट परफॉरमेस अप्रेजल रिपोर्ट रिकॉडिंग ऑनलाइन विंडो म्हणजे स्पैरो लागू केले आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग ने हे सेंट्रल सेक्रेटेरियट सर्व्हिस (सीएसएस), सेंट्रल सेक्रेटेरियट स्टेनोग्राफर्स (सीएसएसएस) आणि सेंट्रल सेक्रेटेरियट क्लेरिकल सर्व्हिसेज (सीएससीएस) यांच्यासाठी हे स्पैरो लागू करण्यात आले आहे. या सर्व विभागांना, मंत्रालयांना सांगण्यात आले की येत्या १० नोव्हेबरपर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्पैरो मध्ये ऑनलाईन काम सुरु केले पाहिजे.

स्पैरो च्या अंतर्गत वार्षिक मुल्यांकन रिपोर्टचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की अजूनही अनेक अधिकाऱ्यांच्या कामाचे मुल्यमापन केले जाऊ शकत नाही़ आणि अनेकांचे वार्षिक मुल्यांकन रिपोर्ट प्रलंबित आहेत. स्पैरा हे एक असे सॉफ्टवेअर आहे की ज्यात कर्मचाऱ्यांच्या कामाचे मुल्यांकन ऑनलाईन केले जाते. ही ऑनलाइन परफार्मस असेस्मेट सिस्टिम आह. या द्वारे कर्मचाऱ्यांचे काम ट्रॅक केले जाऊ शकते.

नॅशनल इंफॉमेटिक्सस सेंटरने हे सॉफ्टवेअर बनविले आहे. या मार्फत भ्रष्ट आणि कामचोर कर्मचाऱ्यांवर लगाम घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सॉफ्टवेअरचे वैशिष्टय म्हणजे या सॉफ्टवेअरमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सर्व माहिती एक प्लॅटफॉर्मवर येते आणि ती एका क्लिकवर उपलब्ध होते. कर्मचाऱ्यांना बढती देण्याचे काम आता अधिक पारदर्शीपणे होण्यास मदत होणार आहे.

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार