Baramati Lok Sabha | आमदार दत्तात्रय भरणेंनी केली सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ, आपबिती सांगताना नाना गवळी ढसाढसा रडले (Video)

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Baramati Lok Sabha | बारामती लोकसभेची निवडणूक अरेरवी, धमक्या, दादागिरी आणि शिवीगाळ इथपर्यंत पोहचली आहे. इंदापूरचे आमदार (Indapur MLA) दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे कार्यकर्ते नाना गवळी यांना शिवीगाळ केली. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. यानंतर सुप्रिया सुळेंनी नाना गवळी यांची भेट घेतली, असता आपबिती सांगताना नाना गवळींचा अश्रूंचा बांध फुटला आणि ते ढसाढसा रडले. सध्या या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आज बारामतीमध्ये मतदान सुरू असताना घडलेला हा प्रकार धक्कादाय मानला आहे.(Baramati Lok Sabha)

आमदार दत्तात्रय भरणे यांनी नाना गवळी यांना शिवीगाळ करतानाचा व्हायरल व्हिडीओ रोहित पवार यांनी एक्सवर शेअर केला असून त्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. तसेच आमदार दत्तात्रय भरणे आणि अजित पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर लोक संपप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

आमदार दत्तात्रय भरणेंनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ते नाना गवळींची भेट घेतली.
त्यावेळी गवळींनी घडलेला सर्व प्रकार सांगितला.
हे सर्व सांगताना त्यांना भरून आले, डोळे पाणवले आणि त्यांचा अश्रूंचा बांध फुटला, ते ढसाढसा रडले.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओसोबत लिहिले आहे की,
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य,
माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडीओत बघा.

विशेष म्हणजे, ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत.
ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना
आणि दपडशाहीला भीक घालणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Shriniwas Pawar | अजित पवार यांनी बंधू श्रीनिवास पवारांना दिले प्रत्युत्तर, बाबा तूच वस्तरा घेऊन ये, आणि…

Sanjay Raut On Ajit Pawar | संजय राऊतांची अजित पवार, नारायण राणेंवर खरपूर टीका, म्हणाले ”मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजाने त्यांना…”

Baramati Lok Sabha | बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस, अजित पवार गटाने पैसे वाटल्याचा आरोप, तक्रार दाखल, रोहित पवारांनी शेयर केले व्हिडिओ, पीडीसी बँक रात्री बारा वाजताही सुरू (Video)