Solapur Rural Police | सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मान

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Rural Police | अवैध दारु व्यवसायाच्या समूळ उच्चाटनासाठी सोलापूर जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (IPS Tejashwi Satpute) यांनी नाविण्यपूर्ण पद्धतीने ‘ऑपरेशन परिवर्तन’ (Operation Parivartan) राबवले होते. या उपक्रमाचे संसदेत कौतुक करण्यात आले होते. शुक्रवारी जागतिक नागरिक सेवा दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीणचे पोलीस (Solapur Rural Police) अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (IPS Shirish Sardeshpande) यांचा सन्मान करण्यात आला.

 

 

सोलापूर जिल्ह्यातील ऑपरेशन परिवर्तन उपक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सोलापूर ग्रामीणचे पोलीस (Solapur Rural Police) अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (SP Shirish Sardeshpande) यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सोलापूर जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात ऑपरेशन परिवर्तन वर्ष 2021-22 मध्ये राबवण्यात आले होते. त्यांच्या या कामाची दखल घेत नागरी सेवादिनी उपक्रमाला पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अवैध व्यवसायात (Illegal Business) गुंतलेल्या व्यक्तींना त्यातून बाहेर काढून सर्व सामान्यांप्रमाणे जीवन जगता यावे यासाठी रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला होता. या उपक्रमाची देशाच्या संसदेत खूप प्रशंसा झाली होती.

 

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने राबवलेल्या उपक्रमास पोलीस यंत्रणेचे सहकार्य आणि स्थानिकांची साथ मिळाली.
यामुळे अवैध धंद्यात गुंतलेल्यांना त्यातून बाहेर काढण्यात यश आले. तसेच त्या लोकांचे आयुष्य पालटले.
त्यांच्या या कार्य़ाची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोलापूरचे सध्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी स्वीकारला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले (API Atul Bhosale) व सहायक फौजदार निलकंठ जाधवर (ASI Nilkanth Jadwar) हे उपस्थित होते.

 

Web Title :- Solapur Rural Police | Solapur Rural Police Force felicitated by Prime Minister Narendra Modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | अत्याधुनिक तंत्रज्ञानातून पारदर्शक आणि गतिमान सेवा पुरवाव्यात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune RTO News | उबेरसह चार कंपन्यांना तीनचाकी ऑटोरिक्षा ‘ॲग्रीगेटर लायसन्स’ नाकारले

Chandrashekhar Bawankule | ‘महाविकास आघाडीतील नेतेच अजितदादांना जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत’ – चंद्रशेखर बावनकुळे (व्हिडिओ)