Sonalee Kulkarni | सोनालीचे होते ‘हे’ सेलिब्रिटी क्रश; फक्त नावं सारखं म्हणून गेली डेटवर

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वातील अप्सरा अशी ओळख असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही तिच्या ‘डेट भेट’ चित्रपटामुळे (Date Bhet Movie) चर्चेत आली आहे. सोनाली हिचा मोठा चागता वर्ग आहे. तिच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांना नेहमी उत्सुकता असते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या ‘डेट भेट’ चित्रपटाचे प्रमोशन करत होती. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) व हेमंत ढोमे (Hemant Dhome) या कलाकरांनी भूमिका साकारली आहे. प्रमोशन दरम्यान या कलाकारांनी त्याचे पहिले प्रेम, डेट अशा अनेक वैयक्तिक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) तिचे प्रसिद्ध गायकांवर क्रश असल्याचे कबुल केले.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या सौंदर्यावर व अदांवर घायाळ झालेले अनेक चाहते आहे. अनेकांची ती क्रश आहे. मात्र तिचा देखील एक सेलिब्रिटी क्रश (Sonalee Kulkarni Celebrity Crush) होता. त्याचे नाव होते प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांच्यावर क्रश होते. एका मुलाचे नाव तेच असल्यामुळे मी त्याच्यासोबत डेटवर गेले होते. असे सोनालीने कबुल केले आहे. तिच्या या कबुलीवर हास्यकल्लोळ माजला. सोनाली म्हणाली की, “आता सांगायला काही हरकत नाही. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्यावर माझा प्रचंड क्रश होता. मला एक लंडनहून स्थळ आले होते त्या मुलाचे नावही राहुल देशपांडे होते. केवळ दोघांची नावं सारखी असल्याने मी त्या मुलाला भेटले. पण, तो मुलगा प्रचंड कंटाळवाणा होता. पूर्णवेळ तो अरे बापरे! अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या झोनमध्ये होता.”

पुढे ती म्हणाली की, “जो मुलगा माझ्या ऑनस्क्रीन इमेजच्या प्रेमात आहे अशा मुलाबरोबर मला लग्न करायची इच्छा नव्हती. त्यामुळे मी त्याला थोड्यावेळाने चला आपण निघूया…असे म्हणाले. त्यावर तो मुलगा मला म्हणाला, मला माहितीये तुला मी आवडलो नाही. पण, मी तुला भेटलो हेच माझ्यासाठी खूप आहे. त्याच्या मनात माझ्याशी लग्न वगैरे करण्याचा अजिबात विचार नव्हता. तो मुलगा हे माझ्या तोंडावर मला हे म्हणाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी त्याला ब्लॉक केले.”सोनालीचा हा अजब डेटचा किस्सा ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटले.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही तिच्या चित्रपटांबरोबर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सोनालीने नटरंग (Natarang), मितवा (Mitwaa), हिरकणी (Hirkani) व पांडू (Pandu) यांसारख्या अनेक हिट चित्रपटामध्ये कामं केली आहेत. तिने 2021 साली कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. तिचे व कुणालचे अनेक फोटो (Sonalee Kulkarni Husband) सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMC Property Tax Deadline Extended by Pune Municipal Corporation, Bringing Relief to Citizens

PMC Property Tax | पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून मिळकत कर भरण्यासाठी मुदत वाढ