Sonam Kapoor : लग्नानंतर सोनमचे नाव काय झाले?

आपल्या भारतीय परंपरेत लग्नानंतर सुनेचे नाव बदलण्याची पद्धत आहे. आता लग्नानंतर सोनम कपूर देखील आपले नाव बदलणार का असे कुतूहल होते . सोनम कपूर आता सोनम कपूर सोनम आहुजा झाली आहे.
आपल्या इंस्टाग्राम खात्यावर सोनमने तिचे नाव सोनम कपूर न ठेवता सोनम आहुजा असे केले आहे. विशेष म्हणजे हा बदल तिने लग्न झाल्यानंतर काही क्षणातच केल्याचे समजते. त्यामुळे आता सोनम आहुजा हीच तिची नवी ओळख असे म्हणावे लागेल.

आनंद अहूजासोबत सोनम जवळपास गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. सुरुवातीला या दोघांनीही आपल्या रिलेशनशिपविषयी काहीच वाच्यता केली नव्हती. पण, विविध कार्यक्रमांना त्यांनी एकत्र हजेरी लावणे आणि सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ पोस्ट करणे या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या रिलेशनशिपविषयी अनेकांनीच अंदाज बांधण्यास सुरुवात केली होती. अखेर दोघांच्याही कुटुंबियांनी या नात्यावर शिक्कामोर्तब करत त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली. नुकताच त्यांचा दिमाखदार सोहळ्यात त्यांची लग्नगाठ बांधली गेली. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीतून वेळ काढत सोनमने आयुष्याच्या एका महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. पण, पुन्हा एकदा ती लवकरच आपल्या करिअरकडे वळणार असल्याचे म्हटले जात आहे.