… म्हणून शहराचं नाव पडलं ‘सोनभद्र’, ‘ही’ आहे भौगोलिक परिस्थिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तीन हजार टनपेक्षा जास्त सोने जमिनीच्या आत असल्याची माहिती मिळताच यूपीमधील सोनभद्र अचानक चर्चेत आले आहे. यासंबंधित माहिती मिळताच यूपी सरकारने ती खाण खोदण्यास सुरुवात केली. मात्र, भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) शनिवारी सांगितले की, या खाणीत 3000 टन नव्हे तर केवळ 160 किलो सोने आहे. दरम्यान, या भागात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याने त्याचे नाव सोनभद्र असे ठेवले गेले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया टीमला सुमारे 15 वर्षांपूर्वी येथे मोठ्या प्रमाणात सोने असल्याची माहिती मिळावी होती. त्यानंतर येथे शोधकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, या भागातील नदीत सोन्याचे कण सापडतात, त्यामुळे तेथील नदीला सोन असे नाव पडले आणि यामुळे त्या भागाला सोनभद्र असे नाव पडले आहे. तज्ज्ञांच्या मते, या भागातील पर्वतीय दगडांत सोन्याचे गुण आढळतात, त्या मुळे इथल्या नद्यांमध्ये सोन्याचे कण सापडतात कारण जेव्हा हे खडक फुटतात आणि नदीच्या संपर्कात येतात. तज्ञांच्या मते सोनभद्रातील सोनकोरवा या ठिकाणी सोन्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले आहे आणि स्थानिक लोकांनी अनेकदा ते काढण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, स्थानिक लोकांना 20 फुटांपर्यंत खणणे शक्य झाले आणि त्यात सापडलेले सोने त्यांच्याकडे ठेवले.

सोनभद्र विषयी, लोकांचा असा विश्वास आहे की सोन्याव्यतिरिक्त या भागात अनेक मौल्यवान धातू सापडतात. कदाचित याच कारणामुळे यूपी शहराला औद्योगिक जिल्हा देखील म्हटले जाते. येथे अनेक वीजनिर्मिती केंद्रे बसविली गेली आहेत. सोन्याव्यतिरिक्त तेथे युरेनियम सापडण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. म्योरपुर ब्लॉकमध्ये असलेल्या कुदरी टेकडीवर सर्वेक्षण करण्यासाठी खोदकामही सुरू करण्यात आले आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (जीएसआय) संघ हेलिकॉप्टरद्वारे एरोमाग्नेटिक सिस्टम द्वारे कुदरीचे जलद सर्वेक्षण करीत आहे. याशिवाय शेजारच्या राज्यांमध्येही सर्वेक्षण केले जात आहे.

सोनभद्र जिल्हा न्यायदंडाधिकारी एस. राजलिंगम म्हणाले, “सर्वेक्षण पथकाला दोन टेकड्यांमध्ये सोनं सापडल आहे. युरेनियमचे सर्वेक्षण सुरू आहे. कुदरी डोंगराळ भागात हवाई सर्वेक्षण सुरूआहे. आत्ता या प्रकरणात सविस्तर माहिती दिली जाईल.” तसेच लखनऊ विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागाचे प्रा. ध्रुवसेन म्हणाले, “सोनभद्रच्या टेकड्यांमध्ये युरेनियम आढळतो, पण त्याचे रचना किती आहे हे माहित असणे आवश्यक आहे. ज्या देशात युरेनियम आहे तो देश आर्थिकदृष्ट्या सुदृढ असतो.