South Film Actress | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला दुर्मिळ आजार; मेगास्टार चिरंजीवी यांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
पोलीसनामा ऑनलाईन टीम : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री (South Film Actress) समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या काही कारणामुळे चर्चेत आहे. समंथा (Samantha) हिला दुर्मिळ असा ‘मायोसिटिस’ या ऑटोइम्युन (Myositis Diagnosis) आजाराचे निदान झाल्याचे समोर आले आहे. समंथा हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट (Instagram Account) वरून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. याबद्दलची माहिती देताना तिने म्हटले आहे की, “यातून बरी झाल्यावर चाहतांना मी ही गोष्ट सांगणार होते मात्र यातून बरे होण्यास मला आणखीन काही काळ लागणार असल्याचे” तिने यात स्पष्ट केले आहे. या तिच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तिला धीर दिला आहे. त्याचबरोबर पटकन बरे होण्यास शुभेच्छा देखील दिले आहेत. (South Film Actress)
या तिच्या पोस्टनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) यांनी देखील तिला दिलासा देणारी पोस्ट ट्विटर केली आहे. यामध्ये त्यांनी समंथाला निश्चय ठेवण्याचा त्याचबरोबर खचून न जाता धाडसीने या आजारावर मात करण्याचा सल्ला दिला आहे. तर तुझ्यात या आजारावर मात करण्याचे ताकद असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर पोस्टच्या शेवटी त्यांनी समंथाला तू लवकरात लवकर बरी व्हावी असे कॅप्शन देखील त्यांनी दिले आहे. (South Film Actress)
Wishing you speedy recovery!!@Samanthaprabhu2 pic.twitter.com/ZWGUv767VD
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) October 30, 2022
चिरंजीवी यांच्या या पोस्टवर समंथाने देखील त्यांना धन्यवाद सर असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. तर त्यांच्या या पोस्टवर दुलकर सलमान, ज्युनियर एनटीआर, लक्ष्मी मंचू, श्रीया सरन आणि हंसिका मोटवानी यांनीसुद्धा कमेंट करत समंथाला धीर दिला आहे.
Web Title :- South Film Actress | chiranjeevi writes heartfelt letter for samantha ruth prabhu after her myositis diagnosis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Airtel ग्राहकांसाठी गुड न्यूज! मोबाईल रिचार्ज करा आणि मिळवा 25 टक्के कॅशबॅक!
Indian Medical Association | इंडीयन मेडीकल अशोशिएशनची वार्षिक बैठकीत डॉक्टरांची मारामारी