पत्नीने एकांतात भेटण्यास दिला नकार, संतापलेल्या कैदी पतीने कापले गुप्तांग

माद्रिद: पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीने एकांतात भेटण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या एका कैद्याने आपले गुप्तांग कापून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कैद्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. शरीरातून अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. ख्रिसमसच्या एक दिवस अगोदर दक्षिण-पश्चिम स्पेनमधील कॅडिजजवळील प्यूर्टो डी सांता मारिया तुरुंगात ही घटना घडली आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ख्रिसमसच्या एक दिवसआधी दक्षिण-पश्चिम स्पेनमधील कॅडिजजवळील प्यूर्टो डी सांता मारिया तुरुंगात ही घटना घडली. तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कैद्याने आपल्या पत्नीला वैवाहिक मुलाखतीत भेटीसाठी (Conjugal Visits) वारंवार विचारणा केली होती. त्यावेळी पत्नीने आपल्या पतीची मागणी धुडकावून लावली. पत्नीच्या नकारामुळे संतापलेल्या पतीने आपले गुप्तांग कापले. हा कैदी मनोरुग्ण असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

दरम्यान तुरुंगात या कैद्याकडे धारदार शस्त्र कसे आले याबाबतही चौकशी केली. या कैद्याने प्लास्टीकच्या एका तुकड्याला धारदार धातूसोबत जोडून त्याचा चाकू तयार केला. त्यानंतर सर्व सुरक्षा रक्षक निघून गेल्यानंतर त्याने स्वत:चे गुप्तांग कापले.

काय असते वैवाहिक मुलाखत?
वैवाहिक मुलाखत (Conjugal Visits) मध्ये कैद्यांना आपल्या पत्नींसह काही तास एकांतात भेटण्याची सवलत दिली जाते. ही सुविधा फक्त तुरुंगात चांगली वागणूक असणाऱ्या कैद्यांना दिली जाते. युरोपातील अनेक देशांमध्ये ही सुविधा दिली जाते. त्यामुळे अनेक कैदी तुरुंगात शिक्षा भोगत असताना देखील वडील बनतात.