नोकरीची सुवर्णसंधी ! स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 320 जगासाठी भरती, पगार 1.50 लाख रुपये

दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये (SAI) ३२० जगासाठी भरती होणार आहे. प्राधिकरणामध्ये नोकरी करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. कोच आणि सहाय्यक कोच पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांना ४ वर्षांच्या सुरुवातीच्या काळात कंत्राटी पद्धतीने नोकरी दिली जाणार आहे. या काळात दर वर्षी उमेदवारांचा परफॉर्मन्स पाहिला जाणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण २०२१ साठी अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख २० मे आहे.

पदानुसार जागा –

कोच – १००
सहाय्यक कोच – २२०
एकूण पदे – ३२०

शैक्षणिक पात्रता –

कोच –

SAI, NS NIS किंवा अन्य मान्यताप्राप्त विद्यापीठाची विंका ऑलिंपिक, विश्व चॅम्पियनशिपमध्ये २ वेळा विजेता, ऑलिंपिक किंवा आंतरराष्ट्रीय़ स्पर्धेत सहभाग, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त खेळाडूकडून कोचिंग-डिप्लोमा.

सहाय्यक कोच –

SAI, NS NIS किंवा ऑलिंपिक, आंतरराष्ट्रीय़ स्पर्धेत सहभाग, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त खेळाडूकडून सहाय्यक कोचिंग-डिप्लोमा.

वेतन –

कोच –  १०५००० /- ते १,५०००० /-
सहाय्यक कोच –  ४१,४२० /- ते १,१२,४०० /-

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  २० मे

अधिकृत वेबसाईट –
sportsauthorityofindia.nic.in