केंद्राकडून सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 12 वी पास उमेदवारांना प्राधान्य, 80 हजाराहून अधिक पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी निवड आयोगाकडून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची तारीख 3 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. एसएससीच्या अधिकृत वेबासाइटवर या संबंधित माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 12 वी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. केंद्र सरकारमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची प्रारंभाची तारीख – 3 डिसेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 1 जानेवारी 2020
SSC CHSL 2019 परिक्षेची तारीख – 16 ते 27 मार्च 2020 दरम्यान

शैक्षणिक पात्रता –
12 वी पास उमेदवार सीएचएसएल 2019 या पदांसाठी अर्ज करु शकतात. यासंबंधित आधिक माहिती एसएससीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

वयोमर्यादा –
उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि अधिक वय 27 वर्ष निश्चित करण्यात आले आहे.
सरकारी नियमांप्रमाणे आरक्षित जागांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

असा करा अर्ज –
इच्छुक उमेदवार या पदांसाठी 3 डिसेंबर ते 1 जानेवारी 2019 दरम्यान अर्ज करु शकतात. हा अर्ज उमेदवारांनी ऑनलाइन भरावा लागेल. त्यासंबंधित माहिती एसएससीच्या https://ssc.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like