सुशांतच्या बहिणींची याचिका फेटाळा, रियाचे चक्रवर्तीचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

मुंबई : अभिनेता सुशांत मृत्यूप्रकरणी सध्या सीबीआय तपास करीत आहे. सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल एम्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. या प्रकरणाला ड्रग्ज अॅगलने वेगळे वळण लागले. आता सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्तीने मुंबई उच्च न्यायालयात आज एक आज प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याच्या बहीणी प्रियंका आणि मितू सिंह यांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्याची मागणी रिया चक्रवर्तीने प्रतिज्ञापत्राद्वारे केली आहे.

बनावट प्रिस्क्रिप्शनद्वारे सुशांतला प्रतिबंधित औषधे दिल्याचा आरोप रियाने सुशांतच्या बहिणींवर केला आहे. त्याबाबत तिने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी सुशांतची बहीण प्रियंका आणि मितू सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

या प्रकरणात आम्हाला अडकविण्यासाठी असा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीच्या डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीनुसार औषधे दिली. जर डॉक्‍टरांनी प्रिस्क्रिप्शन दिले असेल, तर त्यामध्ये चूक काय, असा दावा त्यांनी याचिकेत केला आहे.

रियाच्या वतीने ऍड. सतीश मानेशिंदे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. सध्या तपास प्राथमिक टप्प्यात आहे. पोलिसांना तपासाला अवधी मिळायला हवा, असेही रियाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सुशांतसिंह प्रकरणात रियाला अटक झाली होती. उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला आहे.

You might also like