एसटी कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा वाढीव पगार मिळणार

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

एसटी कर्मचाऱ्यांचा दर चार वर्षांनी वेतनकरार होत असतो. मात्र, २०१६ ते २०२० चा वेतनकरार करण्यासाठी एसटी प्रशासन आणि मान्यता प्राप्त संघटनांमध्ये एकमत होत नसल्याने वेतनकरार रखडला होता. अखेर राज्यसरकारने वेतन कराराला मंजुरी दिल्याने एसटी कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा वाढीव पगार मिळणार आहे.

[amazon_link asins=’B0772RJ2VH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’28eb338c-7d18-11e8-a9c6-595f371b43bd’]

मान्यता प्राप्त संघटनेसोबत वेतनकरारासाठी ३३ बैठका झाल्या होत्या. तर वेतन कराराला तब्बल २३ महिने विलंब झालेला आहे. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ४८४९ कोटींचा वेतन करार ५ जून रोजी जाहीर केला होता. तो मान्य नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जून रोजी दोन दिवसांचा अघोषित संप केला होता. त्यानंतरही वेतन करारावर कोणताही तोडगा निघाला नव्हता. अखेर आता राज्य सरकारनेच कामगार कराराला मंजुरी दिल्यामुळे हा वेतनकरार लागू करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांचा पगार पाच ते १२ हजारांपर्यत वाढणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी तीन वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केले आहे. त्यांना दोन अतिरिक्त वेतनश्रेणी तर पाच वर्षे कनिष्ठ वेतन श्रेणीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना चार अतिरिक्त वेतन श्रेणी या वेतनकरारामुळे मिळणार आहेत. ज्यांनी पाच वर्षे कनिष्ठ श्रेणीत काम केले आहे, त्यांच्या पगारात आठ हजारांची वाढ होणार आहे.