SBI कोट्यावधी ग्राहकांना देतेय मोठी सवलत, जाणून घ्या कोठून खरेदी केल्यावर होईल फायदा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला काहीतरी खास देण्याची योजना आखत असाल तर आज देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला गिफ्ट शॉपिंगवर 50 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. यासाठी तुम्हाला एसबीआय योनो अ‍ॅप वापरावे लागेल. तुम्हाला आयपीजी डॉट कॉमवर योनोच्या माध्यमातून खरेदीवर 20 टक्के सवलत मिळेल. यासाठी IGPSBI कोड वापरावा लागेल.

फर्न एन पेटल्सवर खरेदीसाठी तुम्हाला 200 रुपये फ्लॅट सवलत मिळेल. यासाठी, वापरकर्त्यांना योनो 200 कोड वापरावा लागेल. त्याचप्रमाणे झूम इनवर खरेदी करून तुम्हाला 35 टक्के सूट मिळू शकते. यासाठी, YONO 35 कोड वापरावा लागेल.

जाणून घ्या कोणती कंपनी देतेय सूट

या व्यतिरिक्त, योनोचे वापरकर्ते डेली ऑब्जेक्ट वेबसाइटद्वारे खरेदी करून 35 टक्के पर्यंत सूट घेऊ शकतात. यासाठी, DOSBI35 कोड वापरावा लागेल. याद्वारे खरेदी करून वापरकर्ते 50 टक्के सवलत मिळवू शकतात. यासाठी GIFTCARDS प्रोमो कोड वापरावा लागेल. योनो यूजर्सला टायटन ड्रिंकवर 10 टक्के सवलत मिळेल. या ऑफरसाठी TITANPAY10 कोड वापरावा लागेल.

एसबीआयने केले ट्विट
स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटद्वारे या ऑफरबद्दल माहिती दिली आहे. बँकेने ट्वीटमध्ये लिहिले की, फेब्रुवारी हा फक्त एक महिना नाही तर ही एक संधी आहे, ज्यात आपण भेट देऊन आपले प्रेम व्यक्त करू शकता. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी एसबीआय योनोमार्फत खरेदी करा आणि 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळवा.

– यासाठी, आपण प्रथम आपल्या एसबीआय योनो खात्यावर लॉग इन करा.
– यानंतर शॉप अँड ऑर्डरवर क्लिक करुन खरेदी करा.
– येथून आपण 50 टक्के सवलतीत आपल्या पसंतीचे गिफ्ट घेऊ शकता.