State Excise Department Pune | पुण्यातील कोथरुडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, हॉटेल चालकासह मद्यपींना अटक

एकाच दिवसात दोषारोपपत्र दाखल, न्यायालयाकडून ढाबा चालकाला 1 लाखाचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – State Excise Department Pune | राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने कोथरुड येथील हॉटेल खिंड ढाब्यावर (Hotel Khind Dhaba) अचानक छापा टाकून ढाबा चालकासह त्याठिकाणी मद्यपान करणाऱ्या मद्यपींवर कारवाई केली आहे. पथकाने छापा टाकला त्यावेळी मद्यपींना मद्य पिण्यासाठी याठिकाणी व्यवस्था करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानुसार ढाबाचालकासह चार मद्यपींना अटक करण्यात आली. तसेच एकाच दिवसात आरोपपत्र दाखल करुन न्यायालयासमोर सादर करण्यात आले. न्यायालयाने ढाबा चालकाला एक लाख रुपयांचा दंड आणि मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.(State Excise Department Pune)

राज्य उत्पादन शुल्क ‘सी’ विभागाच्या पथकाने ही कारवाई शनिवारी (दि.27 एप्रिल) कोथरुड येथील हॉटेल खिंड ढाब्यावर छापा टाकून केली. यावेळी ढाबा चालक योगेश सुरेश माथवड हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असताना आढळून आल्याने त्याच्यासह चार मद्यपी ग्राहकांना पथकाने अटक केली. या गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करुन न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, कोर्ट क्र. 1 शिवाजी नगर, पुणे यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रताप बोडेकर, किरण पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक संदीप लोहकरे, महिला जवान उज्ज्वला भाबड, जवान शरद भोर, गोपाळ कानडे व वाहनचालक सचिन इंदलकर यांच्या पथकाने पार पाडली.

लोकसभा निवडणुकी 2024 च्या अचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून बेकायदेशीर
तसेच बनावट मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत.
परराज्यातून दारुच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवली जात आहे.
ढाबा, हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत.
ढाब्यावर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे कायद्याने गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध
यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील, असे राज्य उत्पादन शुल्क सी विभागाचे निरीक्षक एस.एस. कदम
यांनी कळवले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Election Commission Of India | मतदानाची टक्केवारी अचानक वाढवली? देशातील हा प्रकार धक्कादाय, संजय राऊतांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Sharad Pawar On PM Narendra Modi | शरद पवारांनी केली मोदींची नक्कल, म्हणाले, ”जातील तिथं मोदी स्थानिक नेत्यांनी लिहून दिलेली…”