Sharad Pawar On PM Narendra Modi | शरद पवारांनी केली मोदींची नक्कल, म्हणाले, ”जातील तिथं मोदी स्थानिक नेत्यांनी लिहून दिलेली…”

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरमध्ये (PM Modi Kolhapur Sabha) केलेल्या भाषणाची नक्कल आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी करून दाखवली. नमस्कार कोल्हापूरकर. जातील तिथे मोदी स्थानिक नेत्यांनी लिहून दिलेली वाक्य बोलत असतात. स्थानिक भाषेत बोलून भाषणाला सुरुवात करणे ही त्यांची स्टाईल आहे, असे पवार म्हणाले. आज शरद पवार प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये असून सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, मोदी प्रत्येक ठिकाणी स्थानिक नेत्यांचा उल्लेख करतात. पण कराडमध्ये (Karad) यशवंतराव चव्हाणांचा (Yashwantrao Chavan) विसर पडला. कारण स्थानिक नेत्यांनी तसे लिहून दिले नाही. भाजपाचे स्थानिक नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत कितपत आस्था ठेवतात? हा प्रश्न आहे. मोदींनी कराडमध्ये सातारचा उल्लेख केला पण कराडचा उल्लेख केला नाही.(Sharad Pawar On PM Narendra Modi)

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या धार्मिक आरक्षणाच्या आरोपावर शरद पवार म्हणाले, धर्मावर आरक्षण ही कल्पनाच आम्हाला मान्य नाही. जर उद्या मोदींनीही असे आरक्षण देऊ केले तरी आम्ही विरोधात उभे राहू. मोदींचे विधान सामाजिक तणाव आणि कटुता वाढविणारे आहे. या रस्त्याने आपल्याला जायचेच नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, पंतप्रधान देशाचा असतो.
तो उत्तर, दक्षिण नसतो. पण सध्या वेडेपणा सुरू आहे.
दक्षिणेतील राज्यांबाबत संभ्रम निर्माण करून उत्तरेकडील राज्यांमध्ये अधिक पाठिंबा मिळेल, असा त्यांचा प्रयत्न आहे.
लोक हे मान्य करणार नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली होती की, इंडिया आघाडीचे सरकार आल्यास प्रत्येक वर्षी एक असे पाच पंतप्रधान देशाला मिळतील.
याबाबत पवार म्हणाले, हा जावई शोध कुणी लावला? इंडियाचा एकच उद्देश आहे, भाजपाचा पराभव करणे.
पंतप्रधान कोण असणार? याची चर्चा झाली नाही आणि निवडणुकीपूर्वी करणे योग्यही नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Election Commission Of India | मतदानाची टक्केवारी अचानक वाढवली? देशातील हा प्रकार धक्कादाय, संजय राऊतांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Murlidhar Mohol | पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर : मुरलीधर मोहोळ

Amol Kolhe On Gas Cylinder Price | गॅस सिलिंडरच्या तीनवेळा पाया पडा, मग विचार करून मतदान करा, अमोल कोल्हेंचे मतदारांना आवाहन