सेंसेक्स 50 हजारच्या पुढे गेल्याने बाजारात सुरू राहू शकतो ‘नफावसूली’चा काळ, ‘बजेट’कडे लागले सर्वांचे ‘लक्ष’

नवी दिल्ली : सेंसेक्सने मागील आठवड्यात पहिल्यांदा 50 हजाराचा आकडा पार केला. अशावेळी बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की, आगामी दिवसात बाजारात नफावसूलीचा काळ चालू शकतो. विश्लेषकांनी म्हटले की, आता सर्वांचे लक्ष आर्थिक वर्ष 2021-22 च्या बजेटकडे आहे. बजेटमुळे सेंसेक्सच्या पुढील प्रवासाला दिशा मिळेल.

मागच्या वर्षी बाजारात होता चढ-उतार
मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे बाजारात खुप चढ-उतार पहायला मिळाला. बीएसईचा 30 शेयरचा सेंसेक्स 24 मार्चला आपल्या एक वर्षाच्या खालच्या स्तरावर 25,638.9 अंकावर आला. मात्र, पुढील वर्षाच्या दरम्यान सेंसेक्स विक्रमी स्तरपर्यंत गेला.

कन्सोलिडेशन फेजमध्ये राहील दुसर्‍या सहामाहीत बाजार
कोटक सिक्युरिटीजचे एग्झीक्यूटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि फंडामेंटल रिसर्च प्रमुख रुस्मिक ओझा यांनी म्हटले, या कॅलेंडर वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत बाजार कन्सोलिडेशन फेजमध्ये राहील. कॅलेंडर वर्ष 2022 पासून बाजार पुढ जाण्याचा प्रवास पुन्हा होईल.

व्हॅक्सीनच्या अपेक्षेने मध्येच उसळी
बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की, मार्चमध्ये जबरदस्त घसरणीनंतर बाजार विक्रमी स्तरावर पोहचण्याची अनेक कारणे आहेत. जगातील केंद्रीय बँकांनी ग्लोबल फायन्शियल सिस्टममध्ये खुप जास्त रोकड टाकली आहे. याशिवाय अलिकडच्या महिन्यात व्हॅक्सीनच्या आशेने किरकोळ गुंतवणुकदारांच्या भागीदारीत जबरदस्त उसळी आली आहे.

लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 194 लाख कोटी रुपये
गुंतवणुकदारांच्या धारणेत सुधारणेदरम्यान बीएसईच्या लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल लागोपाठ नवा विक्रम बनवत आहे आणि यावेळी ते 194 लाख कोटी रुपये आहे.