चोरीस गेलेले ATM मशीन 5 तासात शोधले; जेजुरी पोलिसांची कामगिरी

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील जेजुरी एमआयडीसी मधून चोरीला गेलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन काही तासातच जेजुरी पोलिसांनी शोधून काढले. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जेजुरी एमआयडीसी मध्ये असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम चोरट्यांनी रात्री दोरखंडाने बांधून वाहनाने ओढून चोरून नेल्या बाबत सकाळी ९.३० वाजता पोलीस ठाण्यात माहिती मिळाली.

पोलीस ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांचा स्टाफ त्या ठिकाणी रवाना झाला त्या ठिकाणी पाहणी केली असता संपुर्ण मशीनच गायब झाल्याचे निदर्शनात आले.त्यानंतर वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.चारी बाजूला पाठवण्यात आली. तसेच सीसीटीव्ही पाहण्यात आले. सीसीटीव्हीमध्ये तर काहीच माहिती उपलब्ध झाले नाही. परंतु अलीकडे पवारवाडी कडे एक कच्चा रस्ता जातो त्या रस्त्याच्या कडेला पोलीस कर्मचारी धर्मवीर खांडे,पोलीस हवालदार संदिप कारंडे हे पाणी करत असतात त्या एटीएम चे नंबर, नट बोल्ट रस्त्यावर पडलेले दिसले.

त्यावेळेस त्यांनी थोडे पुढे जाऊन पाहिले असता एटीएमचे हार्डवेअर बाजूला पडलेले दिसले. त्यानंतर पुढे जाऊन पाहणी केली असता एटीएमचे लोखंडी पेटी दगडांमध्ये लपवली दिसली. रेल्वेचे काम सुरू असल्याने ती पेटी दिसत नव्हती आणि केल्यानंतर सदरची एटीएमची लोखंडी पेटी घाव घालून व न तोडण्याचा प्रयत्न केला व पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतु ती पेटी फुटली नाही म्हणून चोरट्याने ती पेटी निर्जन ठिकाणी सहज लक्षात येणार नाही अशा ठिकाणी लपवून ठेवली.

परंतु पोलिसांनी ती शोधली सदर एटीएम मध्ये चोरीस गेलेले २४ लाख ८८ हजार आत मध्ये सुरक्षित आहे. सदरचे पेटी अवजड असल्याने जेसीबीच्या मदतीने पोलीस ठाण्याचे पहिले एटीएम सेंटरचे लोकांना बोलून सदर पेटी उघडून पैसे जप्त केले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी सुद्धा लवकरच अटक होतील. एटीएम कार्ड लिंक करून मिळेल ही कामगिरी पुणे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार करंडे,नंदकुमार पिंगळे,पोलीस शिपाई धर्मवीर खांडे, अक्षय यादव, पोलीस नाईक गणेश कुतवळ, पोलीस शिपाई प्रवीण शेंडे, प्रशांत पवार,अमोल महाडिक,चालक पोलीस नाईक संजय ढमाळ यांनी केली आहे.