तुमच्या रेशन कार्डमध्ये नोंदवलेले असेल मुलीचे नाव तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

लखीमपुर-खीरी : लग्नानंतर मुलगी सासरी गेल्यानंतर येथील रेशन कार्डातून विवाहित मुलीचे नाव कमी केले जाईल. पुरवठा विभागाचे म्हणणे आहे की, विवाहानंतर मुलगी माहेरात नसल्याने तिचे नाव येथील रेशन कार्डातून कमी केले जाईल, ज्यामुळे जिल्ह्यातील युनिट कमी होतील आणि दुसर्‍या लोकांची कार्ड बनवली जातील. कारण विवाहानंतर सासरी लोक कार्डमध्ये नाव वाढवण्यासाठी अर्ज करतात. अशावेळी दोन्ही ठिकाणी नाव असू नये यासाठी नावे कमी केली जातील.

जिल्हा पुरवठा अधिकारी विजय प्रताप सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यात पात्र कुटुंब रेशन कार्ड धारकांच्या युनिटमध्ये सहभागी त्या मुलींची नावे कमी केली जातील ज्यांचा विवाह झाला आहे आणि त्या सासरी गेल्या आहेत. यामुळे युनिट कमी होतील आणि त्या ठिकाणी नवीन लोकांना संधी मिळेल. कारण जिल्ह्याचा कोटा पूर्ण आहे, नवीन लोकांची कार्ड बनू शकत नाहीत. शेकडो लोक रेशन कार्डसाठी अर्ज करून रांगेत आहेत.

डीएसओने सांगितले की, विवाहानंतर लोक सासरी सुनेचे नाव रेशन कार्डमध्ये वाढवतात. अशावेळी माहेरी नाव कमी केले जाईल. सर्व दुकानदारांना निर्देश देण्यात आले आहेत की, अशाप्रकारची नावे नोंदवून पाठवावीत ज्यातून अशी नावे कमी करता येतील आणि त्यांच्या ठिकाणी नवीन युनीट सहभागी होऊ शकतील. अर्ज करणार्‍या नवीन पात्र लोकांना कार्ड बनवता येईल.

700 पेक्षा जास्त पेंडिंग आहेत अर्ज
जिल्हा पुरवठा अधिकारी विजय प्रताप सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यात सुमारे सातशे अर्ज पेंडिंग आहेत. शहरी क्षेत्रातील कार्डचा कोटा तर सुमोर एक वर्षापूर्वीच फुल आहे. ग्रामीण क्षेत्राचा कोटा सुद्धा पूर्ण आहे. अशावेळी नवीन अर्जदारांना रेशन कार्ड बनवता येत नाहीत. आता अपात्र लोकांची चौकशी करून नावे कमी केल्यानंतर त्यांच्या ठिकाणी नवीन कार्ड तयार होतील. अशा प्रकारे जेव्हा युनिट कमी होती तेव्हा पात्र लोकांचे युनिट वाढतील.