कुत्र्यावरून झालेल्या भांडणात कोर्टात पोहोचला बॉलिवूड अभिनेता, पत्नीला मागितला घटस्फोट

जबलपूर : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंह आणि त्याची कॅनेडियन पत्नी ली एल्टन यांच्यात झालेल्या दोन कुत्र्यांच्या भांडणामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. जबलपूर उच्च न्यायालयात बुधवारी या घटस्फोटाच्या याचिकेवर सुनावणी झाली. अरुणोदयचा डॉगी आणि त्याच्या पत्नीचा डॉगी यांच्यात झालेल्या भांडणामुळे सुरू झालेल्या वादावर हायकोर्टाने भोपाळच्या फॅमिली कोर्टाचा रेकॉर्ड मागितला आहे. संपूर्ण प्रकरण एकतर्फी तलाक निर्णयाला आव्हान देण्याशी संबंधित आहे. यावर पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे.

हे प्रकरण मध्य प्रदेश कॉंग्रेसचे नेते अजय सिंह यांचा मुलगा अरुणोदय सिंहशी संबंधित आहे. ली एल्टनने आपल्या याचिकेत असा युक्तिवाद केला आहे की, अरुणोदयने तिला घटस्फोटाविषयी कोणतीही माहिती दिली नाही आणि तिच्या विरोधात घटस्फोटाचा एकतर्फी आदेश मिळवला. याचिकेत म्हटले गेले आहे की, यासंदर्भात भोपाळ कोर्टाचा आदेश रद्द करावा. कॅनडामधील रहिवासी ली एल्टन आणि अरुणोदय सिंह यांनी भोपाळमध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत नोंदणी केली होती.

लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमधील परस्पर तणाव वाढला. अरुणोदयने अचानक २०१९ दरम्यान येणे-जाणेही थांबवले. १० मे २०१९ रोजी भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात ली एल्टनविरोधात घटस्फोटाचा खटला दाखल करण्यात आला.

दरम्यान ली एल्टन कॅनडाला गेली होती आणि अरुणोदय याच्याविरूद्ध देखभाल आणि वैवाहिक संबंधांचे पुनर्संचयन करण्यासाठी मुंबईत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान १८ डिसेंबर २०१९ रोजी ली एल्टनची माहिती न घेता भोपाळ फॅमिली कोर्टाने घटस्फोटाचा एकतर्फी आदेश काढला.