डॉ. अनिल मिश्रांनी शोधलं कोरोनाच्या विरूध्द DRDO चं नवं औषध; जगातून होतंय ‘कौतुक’

वाराणसी : पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे. या कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी 4 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. मात्र, आता बलिया येथील निवासी असलेले डॉ. अनिल कुमार मिश्र यांनी कोरोनावर प्रभावी असे औषध शोधले आहे.

कोरोना बाधित रुग्ण बरे होण्यासाठी साधारण: 10-14 दिवस लागतात. मात्र, त्याकाळात रुग्णाला अनेक आजारांनी ग्रासलेले असते. त्यामध्ये अंगदुखी, ताप, सर्दी यांसारखी दुखणे उद्भवू शकतात. पण आता कोरोनाच्या प्रचलित उपचाराच्या तुलनेने दोन ते अडीच दिवसांत बरे करणारी औषधे ‘2-डिऑक्सी-डी-ग्लुकोज’ आणली आहेत.

डॉ. अनिल कुमार मिश्र यांनी ‘2-डिऑक्सी-डी-ग्लुकोज’चा शोध लावला आहे. ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलप्मेंट ऑर्गनायझेशन’शी (DRDO) संबंधित डॉ. मिश्र यांना विज्ञान क्षेत्रात अनेक सन्मान मिळाले आहेत. डॉ. मिश्र हे इन्मासचे प्रमुख आणि अतिरिक्त संचालकही आहेत. 2002-03 पासून जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत.

कॅन्सरच्या शोधावर काम

सध्या डॉ. मिश्र हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मिळून न्यूक्लिअर एनर्जी फॉर आंकोलॉजी अँड न्यूरोलॉजी (निओन) वर काम करत आहेत. यातून कॅन्सरचा लवकर फायदा होऊ शकतो.