Guru Rashi parivartan : 2021 मध्ये पहिल्यांदा राशी परिवर्तन करत आहे गुरु, ‘या’ राशींसाठी खुपच शुभ स्थिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बृहस्पती 6 एप्रिल 2021 ला कुंभ राशीत मार्गक्रमण करतील. कुंभ रास शनीची रास आहे. यानंतर गुरु 20 जूनला वक्री होईल आणि पुन्हा परिवर्तन करुन मकर राशीत येईल. यानंतर 20 नोव्हेंबरला गुरु पुन्हा कुंभ राशीत मार्गक्रमण करेल. यापूर्वी गुरु 13 महिन्यांपासून मकर राशीत मार्गक्रमण करत होते.

ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रहाला धन, ज्ञान आणि सत्कर्माचा कारक मानले जाते. बृहस्पतींना देव-देवतांचे गुरु मानले जातात. गुरुने मकर राशीत प्रवेश केल्याने मागील चार महिन्यांपासून सुरू असलेला गुरु-केतुचा योग संपला आहे. गुरुच्या या परिवर्तनाचा अनेक राशींवर प्रभाव असेल.

गुरुचे राशी परिवर्तन आपल्यासोबत विविध राशींसाठी धनलाभ आणि विद्यालाभ घेऊन येते. या राशी परिवर्तनाने वृषभ, मेष आणि मिथुन राशीवाल्यांसाठी गुरु आनंदाचा खजिना आणार आहे. या लोकांना शिक्षणात यश मिळेलच, शिवाय धनलाभाचे सुद्धा अनेक शुभयोग आहेत. तर कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी काळ थोड अडचणींचा असेल. या लोकांना अनेक चिंतांचा सामना करावा लागेल.

तुळ, वृश्चिक राशीवाल्यांना संतती सुखासह धनलाभाचे योग आहेत. या लोकांसाठी काळ खुपच उत्तम आहे.