Aadhaar मध्ये दिलेला जुना मोबाइल नंबर बंद झाला असेल तर ‘या’ पध्दतीनं अपडेट करा New Number, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आधार कार्ड सध्या सर्व महत्वाच्या कामांसाठी आवश्यक झाले आहे. यामुळे जेव्हा तुम्हाला तुमच्या आधार नंबरद्वारे एखादे काम करायचे असते, तेव्हा त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी एक ओटीपी येतो. हा तुमच्या रिजस्टर्ड मोबाइल नंबरवर किंवा ईमेल आयडीवर येतो. अशावेळी मोबाइल नंबर बदलला असेल तर आधार व्हेलिडेट करणारा ओटीपी जुन्या नंबरवर येईल. म्हणजे ओटीपी व्हेरिफिकेशनसह कोणतीही प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करता येणार नाही. यासाठी नवा नंबर कसा अपडेट करायचा ते जाणून घेवूयात…

आधारमध्ये असा अपडेट करा नवीन नंबर

*  सर्वप्रथम आधार एनरॉलमेंट/अपडेट सेंटरवर जावे लागेल.

*  यानंतर आधार कार्ड सुधारणा फॉर्म भरावा लागेल.

*  जो मोबाइल नंबर अपडेट करायचा आहे तो या फॉर्ममध्ये भरा आणि फॉर्म जमा करा. * नंतर पडताळणीसाठी बायोमेट्रिक्स द्यावे लागेल.

*  यानंतर तुम्हाला एक रिसिट दिली जाईल.

*  याच रिसिटमध्ये एक रिक्वेस्ट नंबर मिळेल.

*  यूआरएन वापरून अपडेशन स्टेटस चेक करू शकता.

*  आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन आधार कार्ड घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही.

*  जेव्हा नवीन नंबर आधारसोबत रजिस्टर होईल तेव्हा आधारच्या त्याच बदललेल्या नव्या नंबरवर ओटीपी रिसिव्ह होऊ लागतील.

*  जर तुम्हाला आधारचे अपडेट स्टेटस पहायचे असेल तर युआयडीएआयच्या टोल-फ्री नंबर 1947 वर कॉल करून जाणून घेवू शकता.

कागदपत्रांची आवश्यकता नाही

आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. केवळ फॉर्म भरावा लागेल आणि शुल्क जमा करावे लागेल.