‘हे’ 9 दहशतवादी निशाण्यावर, जम्मू-काश्मीरमध्ये रक्तपात करणाऱ्या ‘या’ दहशतवाद्यांचा शोध सुरू, पोस्टर्स रिलीज

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर पोलिस घाटीत सक्रिय आणि रक्तपात करणार्‍या 9 दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्यांची छायाचित्रेही जाहीर केली आहेत आणि त्यांच्याविषयी काही माहिती असल्यास लोकांना शेअर करण्याचे आवाहन केले आहे. लवकरच त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली जाणार आहे.

शनिवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी हे पोस्टर जारी करत म्हंटले की, श्रीनगरच्या आसपास अनेक दहशतवादी घटनांना ते जबाबदार आहेत. त्यांनी सामान्य नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ला केला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली जाईल. पोलिसांनी फोन नंबरही जारी केले असून त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास ती शेअर करण्याचे आवाहनही लोकांकडून करण्यात आले आहे.

जाहीर केलेल्या पोस्टर्सपैकी पहिला वसीम कादिर मीर आहे, जो शहजाद पोरा नौगम येथील रहिवासी आहे. याशिवाय मेथन छानपोराचा शहद खुर्शीद, अस्तान मोहल्ला नटपोरा येथील रहिवासी इरफान अहमद सोफी, बिलाल अहमद भट, साकिब मंजूर डार, अबिरार नदीम भट, मोहम्मद युसूफ डार, मोहम्मद अब्बास शेख आणि उबैद साफी डार यांचा समावेश आहे.