Advt.

EPFO मध्ये पदवीधारकांना नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) ने एकूण ४२१ पदांची नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागविले आहेत. या अंतर्गत इंफोर्समेंट ऑफिसर/अकाउंट्स ऑफिसर यांची पदे भरली जाणार आहेत. ही सर्व पदे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत भरली जाणार आहेत. या पदांचा प्रोबेशन कालावधी दोन वर्षे असेल. या पदांवर कायमस्वरूपी भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.

इंफोर्समेंट ऑफिसर/ अकाउंट्स ऑफिसर : एकूण पद : ४२१ (अनारक्षित : १६८)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही विषयात बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.

वेतनमान : वेतन मॅट्रिक्स लेव्हल – ८ नुसार.

वयोमर्यादा : जास्तीत जास्त ३० वर्ष
आरक्षित वयोगटाला केंद्र सरकारच्या नियमांनुसार अधिकतम वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया – भरती परीक्षेतील कामगिरीच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्जाचे शुल्क – अर्जाचे शुल्क २५ रुपये असेल. एसबीआयच्या कोणत्याही शाखेत रोख स्वरूपात / मास्टर क्रेडिट / डेबिट कार्ड / व्हिसाद्वारे अर्जाचे शुल्क भरले जाऊ शकते.

अनुसूचित जाती / जमाती / शारीरिक अपंग आणि महिला अर्जदारांना शुल्कातून सूट देण्यात येईल.

येथे पहा सूचना
सूचना पाहण्यासाठी युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.upsc.gov.in) लॉग ऑन करा.
मुख्यपृष्ठावरील उजव्या बाजूला आपल्याला ‘वॉट्स न्यू’ सेक्शन दिसेल. तेथील ‘व्यू ऑल’ वर क्लिक करा.
या नंतर एक नवीन वेबपेज उघडेल. जाहिरात क्रमांक ५१ – २०२० ची लिंक देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करा.
आता ‘डॉक्यूमेंट्स’ या शीर्षकाखाली पीडीएफ लिंकवर क्लिक करा. असे केल्यावर पदांसंबंधित सविस्तर जाहिरात डाउनलोड केली जाईल.
या जाहिरातीस संपूर्णपणे वाचा आणि पदांनुसार आपली पात्रता तपासा

अर्ज प्रक्रिया
वेबसाईट (www.upsconline.nic.in) वर लॉग इन करा. त्यानंतर नवीन वेबपृष्ठावरील Online Recruitment Application(ORA) for the posts of Enforcement Officer (EO)/Accounts Officer (AO) in Employee Provident Fund Organisation, Ministry of Labour and Employment या लिंकवर क्लिक करा.

यानंतर नवीन वेबपृष्ठावर आपल्याला वॅकन्सी नंबर २००१५१०१४११ अंतर्गत पदाचे नाव दिसेल.

पदाच्या पुढे असलेल्या क्लिक हियर पार्ट – १ (रजिस्ट्रेशन) पदाच्या पुढील लिंकवर क्लिक करा. असे केल्याने रजिस्ट्रेशन वेबपृष्ठ उघडेल. येथे मागण्यात आलेली सर्व माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करा आणि शेवटी कॅप्चा कोड भरून सेव्ह आणि कंटीन्यू या बटणावर क्लिक करा.

यानंतर दिलेल्या दिशानिर्देशांनुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा आणि नंतर युजरआयडी व पासवर्डसह लॉगिन करा व अर्ज उघडा.

आता सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज भरा आणि विहित आकाराप्रमाणे फोटो, स्वाक्षरी व इतर मागितलेल्या प्रमाणपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.

भरलेला अर्ज सबमिट करण्यापूर्वी त्यात प्रविष्ट केलेली सर्व माहिती पुन्हा तपासा.

व्यवस्थित तपासून मग सबमिट करा आणि शेवटी ऑनलाईन सबमिशन अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि ते आपल्याकडे सुरक्षित ठेवा.

विशेष तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०२०
अर्जाचा प्रिंटआउट डाउनलोड करण्याची शेवटची तारीख : ०१ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी
वेबसाइट : www.upsc.gov.in
www.upsconline.nic.in

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/