Stretching Exercise | दिवसभर बसून राहण्याने डॅमेज झाल्या असतील नसा, तर जाणून घ्या रुजुता दिवेकर यांनी सांगितलेल्या 10 मिनिटांच्या ‘या’ 8 एक्सरसाईज (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Stretching Exercise | कोविड-19 महामारी (Covid-19 Epidemic) ने खरोखरच आपले जीवन पूर्णपणे बदलून टाकले आहे. घरून काम करणे (Work From Home) आज लोकांसाठी रूढ झाले आहे. कार्यालयीन कामकाजापासून ते शाळा, महाविद्यालयीन अभ्यासापर्यंतची सर्व कामे आता ऑनलाइन (Online) होत आहेत. आपली हालचाल खूपच कमी झाली असल्याने शरीराला जास्त काम करण्याची आणि ताण घेण्याची सवय नाही. परंतु नियमित व्यायामासोबतच (Stretching Exercise) आपण सकस अन्न खाणे फार महत्वाचे आहे.

 

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर (Celebrity Nutritionist Rujuta Divekar) यांनी इंस्टाग्राम (Instagram) वर शरीर तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स (Body Fit Tips) शेअर केल्या आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, दीर्घ वेळ बसून राहिल्याने होणारे नुकसान कमी करण्यासाठी दररोज 10 मिनिटांचा व्यायाम (Exercise) पुरेसा आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही हे व्यायाम तुमच्या जागेवर बसून करू शकता. व्हिडीओमध्ये रुजुता यांनी एका जागी बराच वेळ बसून राहिल्याने होणार्‍या परिणामांबद्दलही सांगितले आहे.

 

जास्त वेळ बसल्याने निर्माण होतात या समस्या (These Problems Are Caused By Sitting For Too Long)
त्यांनी सांगितले की, जे लोक सलग दोन वर्षांपासून घरबसल्या ऑनलाइन काम करत आहेत, त्यांना पाठदुखीची (Back Pain) तक्रार होत आहे. पोटही वाढते, मांड्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. इतकंच नाही तर दिवसभर लॅपटॉप, फोन आणि कम्प्युटरवर समोर पाहिल्याने मान आणि डोक्यावर वाईट परिणाम होतो.

 

सतत बसल्यामुळे शरीराला होणारे नुकसान कमी करण्यासाठी स्ट्रेचिंग व्यायाम (Stretching Exercise) हा एक चांगला मार्ग आहे. रुजुता यांनी एकूण 8 प्रकारचे व्यायाम दाखवले आहेत, जे शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी आणि आरोग्याशी संबंधित समस्या (Health Problems) कमी करण्यास मदत करू शकतात.

 

लठ्ठपणा (Obesity), मधुमेहाने (Diabetes) होऊ शकता ग्रस्त
असे बरेच पुरावे आहेत जे सूचित करतात की संपूर्ण दिवस डेस्कवर किंवा बैठ्या जीवनशैलीचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. मस्कुलोस्केलेटल (Musculoskeletal) व्यतिरिक्त, जे लोक दिवसभर बसतात त्यांना लठ्ठपणा, मधुमेह, हृदय समस्या (Heart Problems), चयापचय विकार (Metabolic Disorders), कर्करोग (Cancer) आणि लवकर मृत्यूचा धोका (Death Risk) वाढतो.

 

8 सोपे स्ट्रेचिंग व्यायाम (8 Easy Stretching Exercises)

लेग रेज (Leg Rage) – 5 रेप्स

स्ट्रेट लेग लिफ्ट (Straight Leg Lift) – 5 रेप्स

काफ स्ट्रेच (Kaf Stretch) – 5 रेप्स

हॅमस्ट्रिंग स्ट्रेच (Hamstring Stretch) – 5 रेप्स

अप्पर बॉडी ट्विस्ट (Upper Body Twist) – 5 रेप्स

शोल्डर स्ट्रेच (Shoulder Stretch) – 5 रेप्स

आर्म स्ट्रेच (Arm Stretch) – 5 रेप्स

बॅक अँड नेक स्ट्रेच (Back And Neck Stretch) – 5 रेप्स

 

स्ट्रेचिंगचे फायदे (Benefits Of Stretching)
स्ट्रेचिंगचे अनेक फायदे आहेत. हे स्नायूंच्या हालचालींची लवचिकता (Flexibility Of Muscle Movements) आणि गतीची क्षमता सुधारण्यास मदत करते. यासह, स्ट्रेचिंगमुळे स्नायूंमध्ये रक्त प्रवाह (Blood Flow) सुधारण्यास आणि दुखापतींचा धोका कमी होण्यास मदत होते. शारीरिक कार्यक्षमता (Physical Efficiency) सुधारण्यासाठी स्ट्रेचिंग हा सर्वोत्तम मार्ग आहे. जे लोक दिवसभर बसून काम करतात त्यांच्यासाठी स्ट्रेचिंग हा स्वतःला फिट ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Stretching Exercise | 8 easy stretches that can reduce the damage caused by sitting for long hours

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PPF vs NPS vs SSY Minimum Deposit Money | PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी योजनेत असेल खाते तर वाचा ही महत्वाची बातमी, अन्यथा नंतर वाढेल समस्या

 

Varicose Veins Prevention | पायात का दिसतात निळ्या नसा, हा आजार आहे का? जाणून घ्या कारण आणि बचावाच्या पद्धती

 

Pune Crime | अजित पवारांच्या PA शी ओळख असल्याचे सांगून उकळले 10 लाख; बंडगार्डन पोलिसांकडून वाईमधील एकाला अटक