Subi Suresh Passes Away | मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे निधन; वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Subi Suresh Passes Away | गेल्या अनेक दिवसांपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. आज पुन्हा एकदा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन (Subi Suresh Passes Away) झाले आहे. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री यकृता संबंधी आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर कोची येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. नृत्यांगणा म्हणून सुबीने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने विनोदी कार्यक्रमात काम केले आहे.

 

मल्याळम चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी सुबी सुरेश देखील एक होत्या. त्यांनी आजवर अनेक कॉमेडी शो आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या विनोदी शैलीने त्यांनी प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. ‘कुट्टी पट्टलम’ हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम होता. आज वर त्यांनी ‘गृहनाथन’, ‘Thaksara Lahala’, ‘एलसम्मा एन्ना आंकू’ या लोकप्रिय सिनेमात देखील आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत. ‘सिनेमाला’ या मल्याळम कार्यक्रमाचे त्यांनी निवेदनही केले आहे. ‘कनस सिम्हासनम’ या सिनेमाच्या माध्यमातून 2006 साली सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांना चांगली प्रसिद्धी ‘कुट्टीपट्टलम’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमातून मिळाली होती. त्यानंतर त्यांनी हस्बैंड, ‘एल्सम्मा एना अंकुट्टी’ या सिनेमात काम केले.

 

सुबी यांच्या निधनाची (Subi Suresh Passes Away) माहिती त्यांच्या अधिकृत अकाउंट वरून ऍडमिनने पोस्ट केली आहे.
पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, “एका गोष्टीचा शेवट झाल्यानंतर नवीन गोष्टीची सुरुवात होते.
पुन्हा भेटू धन्यवाद”. सध्या या पोस्टवर मल्याळम सृष्टीतील अनेक कलाकार त्याचबरोबर चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Subi Suresh Passes Away | subi suresh death malayalam actor tv show host subi suresh passes away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Temperature | विदर्भात उन्हाळ्याची लागली चाहूल; जाणून घ्या बाकीच्या जिल्ह्यात काय आहे स्थिती ?

NCP Chief Sharad Pawar | ‘पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे…’ शरद पवारांचं मोठं विधान (व्हिडिओ)

Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या