Subodh Bhave | ‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड’ या हिंदी वेब सिरीज मधील बिरबलच्या भूमिकेतील सुबोध भावे यांचा लुक व्हायरल; लुकवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन : Subodh Bhave | मराठी सिनेसृष्टीत अभिनेता सुबोध भावे यांनी आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे. अनेक वर्ष त्यांनी मराठी मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये विविध भूमिका उत्तम पद्धतीने साकारले आहे. तर आता लवकरच सुबोध भावे एका हिंदी वेब सिरीज मध्ये दिसणार आहेत. ‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड.’ असे या वेब सिरीजचे नाव असून नुकताच या वेब सिरीज मधील सुबोध भावेंचा फर्स्ट लूक शेअर झाला आहे. एकीकडे सुबोध भावेंचे चाहते या वेब सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या या लूक वरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. (Subodh Bhave)

‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड’ या वेब सिरीज मध्ये मुघल साम्राज्यातील अंतर्गत हेवेदावे, सत्ता आणि वारस हक्कासाठी झालेला संघर्ष दाखवण्यात येणार आहे. तर ही वेब सिरीज ‘झी 5’वर प्रदर्शित होणार आहे. या वेब सिरीज मध्ये सुबोध भावे हे बिरबल च्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच एका कार्यक्रमात या वेब सिरीजची घोषणा करण्यात आली होती. सुबोध भावेंनी या वेब सिरीज मधील त्यांचा फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शन मध्ये म्हटले की “फर्स्ट लूक टेस्ट”. सध्या सुबोध भावेंनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (Subodh Bhave)

सुबोध भावेंनी शेअर केलेल्या त्यांच्या पोस्टवर अनेक कमेंट पहायला मिळत आहेत.
एका नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटले की, “इतका स्मार्ट होता का बिरबल?” तर दुसऱ्याने म्हटले “अरे देवा यानंतर अकबर”.
तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “सुबोध तू ऐतिहासिक भूमिका करणार नाही असे बोलला होतास”.
“सर मला वाटलं तुम्ही हिंदीमध्ये काम करणार नाही” तर दुसऱ्या एकाने म्हटले “नसिरुद्दीन शहा यांच्याबरोबर
काम करायला मिळालं आहे या वेब सिरीजमधून म्हणून मध्यंतरी लेफ्टीस्ट पोस्ट शेअर करत होतास”
अशा अनेक कमेंट सुबोध भावे यांनी शेअर केलेल्या पोस्ट वर पाहायला मिळत आहेत.
तर सुबोध भावेंची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

ही वेब सिरीज 3 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेब सिरीज मध्ये अकबरच्या भूमिकेत नसिरुद्दीन शहा दिसणार आहेत. तर अदिती राव हैदरी अनारकलीची भूमिका साकारणार आहे.
तर सलीमच्या भूमिकेत अभिनेता आशीम गुलाटी दिसणार आहे.
त्या व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे ही या वेब सिरीज मध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Web Title :- Subodh Bhave | subodh bhave gets troll for his first look in taj divided by blood series

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मैत्रिणीने लावली सिगारेट आणि गांजाची सवय, बॉयफ्रेंडने केले असे काही की तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Shiv Thakare | अखेर शिव ठाकरेने वीणा सोबतच्या त्याच्या नात्याबाबत केले भाष्य; म्हणाला “आमच्यातील मैत्री अजूनही…..”