Sudhir Munguntivar | भाजपाकडून उमेदवारी भरण्याचा शुभारंभ, देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात सर्व जुने रेकॉर्ड…

चंद्रपूर : Sudhir Munguntivar | चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून (Chandrapur Lok Sabha) निवडणूक लढवणारे भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्रातील आमचे सर्व जुने रेकॉर्ड आम्ही तोडणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करुन, आणि चंद्रपूरची आई महाकालीचे दर्शन घेऊन आम्ही आज सुधीर मुनगंटीवार यांचा फॉर्म भरला आहे. आज नवी सुरुवात झाली असून शेवटही चांगलाच होईल. महाराष्ट्रात आम्ही आमचचे सर्व जुने रेकॉर्ड मोडू.(Sudhir Munguntivar)

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ही राज्याची निवडणूक नाही, तर ही देशाची निवडणूक आहे.
देश कोणाला सोपवायचा आहे, देशात राज्य कोणाचे आणायचे, मोदींचे की राहुल गांधींचे याचा निर्णय करणारी ही
निवडणूक आहे. सुधीर मुनगंटीवार यांना दिलेले मत मोदींना दिलेले मत ठरेल.

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपाचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ‘एनडीए’तील कर्मचाऱ्याची 57 लाखांची फसवणूक

Pune Lonavala Ragging Case | पुणे : रूममेट मुलींकडून दिव्यांग मुलीची रॅगिंग, त्रास सहन न झाल्याने ‘ब्रेन स्ट्रोक’; लोणावळ्यातील धक्कादायक घटना

Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष ‘वंचित’साठी दोन-दोन जागा सोडणार?