Suhana Khan | शाहरुखची मुलगी सुहाना खानने बॉलीवुडमध्ये पदार्पणापूर्वीच खरेदी केली अलिबागमध्ये कोटींची प्रॉपर्टी

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) ही मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. तिने अनेक ब्रॅन्डसोबत काम केले असून आता ती झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये (Bollywood) पदार्पण करणार आहे. तिच्या या चित्रपटाची आणि लुकची सर्वत्र चर्चा आहे. बॉलीवुडचा सुपरस्टार शाहरुखची (Actor Shah Rukh Khan) ती मुलगी असल्याने अभिनयाचे बाळकडू तिच्यामध्ये कसे समावले गेले आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वीच जमीन खरेदी केली आहे. सुहानाने अलिबाग जवळ शेती करण्यासाठी दीड एकर शेतजमीन खरेदी केली आहे. ही जमीन खरेदी करण्यासाठी सुहानाने स्वतः शेतकरी असल्याचं म्हटलं आहे. (Suhana Khan Property)

बॉलीवुडमधील अनेक सेलिब्रिटी हे अलिबाग मध्ये जमीन खरेदी करत आहे. शाहरुख खानची ही स्वत:ची प्रॉपर्टी अलिबागमध्ये (Alibaug) आहे. त्याचबरोबर जूही चावलानेही (Juhi Chawla) तिथे जमीन खरेदी केली होती. त्या जागी तिने आता फार्महाऊस बांधले आहे. त्याचबरोबर रणवीर सिंग (Ranveer Singh), दीपिका पादूकोन (Deepika Padukone), अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या प्रॉपर्टी अलिबागमध्ये आहेत. आता या यादीमध्ये सुहानाचे नाव दाखल झाले आहे.

सुहानाने खरेदी केलेल्या दीड एकर जमीनीची किंमत जवळपास 12.91 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जून महिन्यात हा व्यवहार झाला असून सुहानाने 77 लाख 46 हजार रुपये स्टॅम्प ड्यूटी जमा केली आहे. अलिबागमधील अंजली, रेखा आणि प्रिया या तीन बहिणींकडून ही जमीन खरेदी करण्यात आली आहे. हि शेतजमीन असून खऱ्या आयुष्यात सुहाना शेती व्यवसायामध्ये पर्याय म्हणून काम करणार का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

सुहानाचा पदार्पणापूर्वीच मोठा चाहता वर्ग आहे. सुहाना खान (Suhana Khan) सोशल मीडियावर फार एक्टीव्ह असून तिचे 3.9 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिच्या आगामी ‘द आर्चीज’ (The Archies) चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला असून यामधील सुहानाच्या लुकचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या सोबत अमिताभ बच्चनचा (Amitabh Bachchan) नातू अगस्त्य नंदा (Agstya Nanda), श्रीदेवीची (Sridevi) धाकटी मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor), मिहिर आहुजा (Mihir Ahuja), वेदांग रैना (Vedang Raina) आणि युवराज मेंडा (Yuvraj Menda) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Web Title :  Suhana Khan | shahrukh khan daughter suhana khan buys farmland in alibaug for 12 crore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globall