Suhana Khan | “माझ्यासाठी हे खूप भीतीदायक होते…”, लंडनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या सुहाना खानने सांगितला अनुभव

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा नेहमी चर्चेत असतो. पण आता त्याच्यासोबत त्याची लाडकी मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील सतत चर्चेत असते. सुहाना लवकरच झोया अख्तरच्या (Zoya Akhtar) ‘द आर्चीस’ (The Archies) या चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये जबरदस्त एन्ट्री करणार आहे. पण त्यापूर्वीच ती बी टाऊन मधील लाईमलाईटमध्ये आली असून तिचा मोठा चाहता वर्ग देखील निर्माण झाला आहे. सुहाना खान (Suhana Khan) हिने कोएल पुरी (Koel Purie) यांच्या ‘क्लिअरली इनव्हिजिबल इन पॅरिस’ (Clearly Invisible In Paris) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती लावली होती. यावेळी तिने तिच्या लंडनमधील (London) अनुभवांबद्दल देखील मत व्यक्त केले आहे.

शाहरुखची लेक सुहाना खान हिने तिचे कॉलेजचे शिक्षण लंडनमध्ये घेतले आहे. यावेळी तिने नव्या शहरामध्ये नव्या कल्चरमध्ये राहणे कसे होते याबद्दल अनुभव शेअर केले आहेत. ‘क्लिअरली इनव्हिजिबल इन पॅरिस’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये सुहाना खान तिची आई गौरी खानसोबत (Gauri Khan) उपस्थित राहिली होती. यावेळी सुहानाने सांगितले की, तिला हे पुस्तक खूप आवडले, कारण जेव्हा ती अभ्यासासाठी परदेशात गेली तेव्हा तिला काही काळ एकटेपणा जाणवला होता.

सुहाना म्हणाली की, “मी स्वत:ला पूर्णपणे स्थलांतरित म्हणणार नाही, कारण मी तिथे शिकायला गेले होते. मी 15 वर्षांची असताना बोर्डिंग स्कूलमध्ये शिकण्यासाठी गेले आणि माझे घर सोडले. त्यामुळे मला वाटते की त्यावेळी हे भीतीदायक होते आणि कल्चरमुळे माझ्यासाठी हा एक मोठा धक्का होता. मग मला तिथे घरासारखे वाटायला थोडा वेळ लागला. पण हे घडले त्याचे महत्त्वाचे कारण होते ते तिथले लोक. तिथल्या लोकांनी मला एकटेपणापासून आणि इनविजिबल होण्यापासून वाचवलं.”असा अनुभव सुहाना खानने पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये सर्वांसोबत शेअर केला.

या सोहळ्याचे काही फोटो गौरी खानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर अभिनेता शाहरुख खानने देखील
कमेंट केली आहे. शाहरुखने लिहिले आहे की, “हो, तू बरोबर आहेस गौरी. आयुष्याचे हे सर्कल पूर्ण करण्यात आपली मुलं
मदत करत आहेत. तू तिन्ही मुलांना खूप छान शिकवण दिली आहेस. त्यांना डिग्निटी शिकवली आहेस आणि सर्वांना प्रेमाने
वागवायला शिकवले. पण त्यांनी माझ्याकडून डिंपल घेतले आहेत. या कार्यक्रमात सुहानाने तिचे मत अगदी योग्य मांडले.”
शाहरुखच्या या कमेंटवर अनेक रिप्लाय आणि लाईक्स येत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder In Wanwadi Pune | वानवडीच्या सय्यदनगर परिसरात तडीपार गुंडाचा खून तर इतर दोघे गंभीर जखमी