Suhas Diwase On Ujani Dam Backwater Boat Accident | अपघात टाळण्यासाठी उजनी धरणाच्या जलाशयातील बोटींबाबत नियमावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Suhas Diwase On Ujani Dam Backwater Boat Accident | दोन दिवसांपूर्वी इंदापूरजवळील उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये एक प्रवासी बोट उलटली. त्यामध्ये या बोटींमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर धरणांच्या जलाशयातून प्रवास करणाऱ्या बोटींबाबत नियमावली तयार करण्याचा विचार जिल्हा प्रशासनाने सुरु केला आहे.(Suhas Diwase On Ujani Dam Backwater Boat Accident)

ही नियमावली तयार केल्यानंतर बोट आणि बोट मालक , चालक यांची संपूर्ण माहिती तहसीलदार आणि तेथील पोलीस प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. यामुळे भविष्यकाळात असे अपघात रोखले जातील असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.

उजनी धरणात मासेमारी करण्यासाठी बोटींचा वापर करण्यात येतो. यासाठी संबंधितांना जलसंपदा विभागाकडून
परवानगी मिळते. मात्र या बोटींचा वापर जलाशयातून प्रवास करण्यासाठी केला जात असल्याचे दिसते.
याबाबत तहसीलदार यांनी अहवाल मागवला आहे.

मुंबई पोलीस अधिनियम किंवा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्यांतर्गत ही नियमावली तयार करता येऊ शकेल.
अशी नियमावली तयार केल्याने असे अपघात टाळता येतील असे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले.
तसेच बोटी चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात येईल असेही ते म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली

Surendra Kumar Agarwal Arrest | पोर्शे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबून ठेवले, धमकी दिली

Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड

Dombivli MIDC Blast | डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या वाढली, अजूनही सापडत आहेत मानवी अवशेष, आकडा आणखी वाढण्याची शक्यता

Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…