Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Vidhan Parishad Election 2024 | शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या (Shikshak-Padvidhar Election ) चार जागांसाठी काल निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आज ताबडतोब शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. हे उमेदवार मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आहेत. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आयोगाच्या कार्यक्रमानुसार २६ जून रोजी मतदान होणार आहे.(Vidhan Parishad Election 2024)

शिवसनेना मध्यवर्ती कार्यालयाने अधिकृत पत्रक जारी करत उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. ज्यामध्ये शिवसेनेने अनिल परब (Anil Parab) आणि ज. मो. अभ्यंकर (J M Abhyankar) यांची नावे जाहीर केली आहे. परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

तर, मुंबई शिक्षक मतदारसंघातून अभ्यंकर यांना उमेदवारी देण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे.
विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर करण्यात शिवसेना ठाकरे गटाने आघाडी घेतली आहे.
ठाकरे गटाने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे.

विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर, मुंबई आणि नाशिक शिक्षक या मतदारसंघांसाठी निवडणुकांचा सुधारित
कार्यक्रम नुकताच निवडणूक आयोगाने काल जाहीर केला आहे.

असा आहे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुक कार्यक्रम

  • ३१ मे ७ जून पर्यंत अर्ज भरणार
  • १० जून रोजी अर्जाची छाननी
  • १२ जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार
  • २६ जून रोजी मतदान होणार
  • १ जुलै रोजी होणार मतमोजणी

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Two Police Officers Suspended In Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरण: येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन

Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!