Sulochana Chavan Passed Away | लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे नुकतेच निधन (Sulochana Chavan Passed Away) झाले. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सुलोचना चव्हाण यांचे आज (शनिवार) दुपारी बाराच्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी (Sulochana Chavan Passed Away) निधन झाले.

वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. सुलोचना चव्हाण यांचा भारत सरकारने (Government of India) पद्मश्री (Padma Shri) देऊन सन्मान केला होता. तेव्हा व्हीलचेअरवर बसूनच त्यांनी तो स्वीकारला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याचे दिसले होते. त्यानंतर त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या नाहीत.

13 मार्च 1933 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. आज संध्याकाळी लाइन्स येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा…’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना…’
‘सोळावं वरीस धोक्याचं…’ ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा…’ यांसारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या.

Web Title :-Sulochana Chavan Passed Away | singer sulochana chavan death at the age of 92

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलू देत आम्हाला घेणे-देणे नाही; आमचे मुख्यमंत्री तोंड कधी उघडणार?’ – संजय राऊत

NCP Leader Ajit Pawar | ‘अरे गोपीचंदा काय बोलतो’ असे म्हणत पडळकरांच्या वक्तव्यावर अजित पवारांची टोलेबाजी; अनेक मुद्द्यांवर मांडले मत