सुनंदा पुष्कर प्रकरणी पुन्हा एकदा शशी थरूर अडकले

नवी दिल्ली :वृत्तसंस्था
सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुनंदाचे पती काँग्रेसचे खासदार शशी थरूर पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडले आहेत. सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांना संशयित आरोपी मानले आहे. दिल्ली पोलिसांनी पतियाला न्यायालयासमोर सादर केलेल्या आरोपपत्रात खासदार पती शशी थरूर यांच्यावर ३०६ ,४९८ ‘अ’ कलमान्वये आरोप लावले आहेत. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आहे.

दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, थरूर संशयाच्या भवऱ्यात आहेत, मात्र त्यांच्या विरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ मे रोजी होणार आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा १७ जानेवारी २०१४ मध्ये एका हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता.

दाखल झालेली याचिका
भाजपचे संसद मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआय तसेच विशेष पथक नेमण्याची मागणी केली होती. यापुर्वी देखील त्यांनी सीबीआयकडे तपास कार्य सोपविण्याची मागणी गृहखात्याकडे केली होती. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी एसआयटीचे तपास कार्य बरेच पुढे गेले असल्याचे सांगितले. अशावेळी सीबीआयकडे तपास हस्तांतरीत करण्यास उशीर होऊ शकतो असे सांगितले. सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार,” शशी थरूर यांना कोर्टात हजर केले जाऊ शकते.

या उच्चभ्रू व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणात तिरुअनंतपुरम येथील काँग्रेसचे हे एकमेव खासदार आरोपी आहेत ज्यांच्यावर दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे हे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की,’सुनंदा आणि शशी यांचा विवाह २२ ऑगस्ट २०१० मध्ये झाला होता आणि त्यानंतर तीन वर्षे ३ महिने आणि १५ दिवसातच सुनंदाची हत्या झाली.’