Sunetra Ajit Pawar | सुनेत्रा पवारांचे बारामतीकरांना आश्वासन, ”केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचे निराकरण करणार”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sunetra Ajit Pawar | जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अजित पवार नेहमीच सकारात्मक असतात. त्यामुळे कोणतीही समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी अजितदादा खंबीरपणे तुमच्या पाठिशी उभे आहेत. त्याचवेळी मी देखील केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा बनून तुमच्या समस्या सोडवण्यावर भर देईन, असे आश्वासन बारामती लोकसभेच्या महायुतीच्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना दिले. (Baramati Lok Sabha)

सुनेत्रा पवार यांनी प्रचारासाठी पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील (Purandar Vidhan Sabha) फुरसुंगी (Phursungi) परिसरात भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.(Sunetra Ajit Pawar)

सुनेत्रा पवार म्हणाल्या, केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचाराचे असेल तर कोणत्याही प्रश्नांची सोडवणुक करणे सोपे जाते.
देशाचे भवितव्य सुरक्षित हातात राहण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे.
त्यासाठी त्यांच्या बाजूने मतदान करणारा खासदार हा आपल्या मतदारसंघातून निवडून जाणे आवश्यक आहे.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हा महायुतीचा (Mahayuti) भाग आहे.
त्यामुळे घड्याळ या चिन्हावर आपण निवडणूक लढवत असून सर्वांनीच हे चिन्ह तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी
प्रयत्नशील राहावे. घड्याळयाला अधिकाधिक मतदान करुन निवडून द्या, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar-Sanjog Waghere | ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे थेट अजितदादांच्या पाया पडले, लग्न सोहळ्यात झाली भेट, पण दादांनी आशीर्वाद दिला का?

Pune Lok Sabha | पुण्यात ठाकरेंच्या सभास्थळावरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद?, धंगेकरांच्या प्रचारापेक्षा आगामी निवडणुकांचा विचार जास्त

Shirur Lok Sabha | डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात ! शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली

Supriya Sule – Pune Traffic Jam | पुण्यातील वाहतूक कोंडीतून सुप्रिया सुळेंनी असा काढला मार्ग, चक्क दुचाकीचा आधार घेत गाठले इच्छित स्थळ, PHOTO व्हायरल