‘अथिया-केएल राहुल’ यांच्या रिलेशनशिपबद्दल सुनील शेट्टी म्हणतो…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – क्रिकेटपटू केएल राहुल आणि ॲक्ट्रेस अथिया शेट्टी यांच्या अफेअरच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. असं असतानाच काही दिवसांपूर्वी ॲक्टर आणि अथियाचे वडिल सुनील शेट्टीनं त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. सुनील शेट्टीनं सांगितलं होतं की, त्याला माहिती आहे की, मुलं कोणाला डेट करत आहेत. त्याला यापासून काहीच प्रॉब्लेम नसल्याचंही त्यानं म्हटलं होतं. परंतु वारंवार त्यांच्या नात्याविषयी विचारल्यानंतर मात्र सुनील शेट्टी वैतागतो आहे. असं काहीसं नुकतच पहायला मिळालं.

https://www.instagram.com/p/B6yFWR_hpgz/

सुनील शेट्टी मुंबईमधील एका इव्हेंटमध्ये आला होता. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला केएल राहुल आणि अथियाच्या रिलेशनशिपबद्दल विचारण्यात आलं. सुनील शेट्टी म्हणाला, “मी रिलेशनशिपमध्ये नाहीये. तुम्ही याबाबत अथियाला विचारायला हवं.” यानंतर त्याला विचारण्यात आलं की, जर खरंच दोघे रिलेशनशिपमध्ये असतील तर तुम्हाला हे मान्य आहे का ? यावर सुनील शेट्टी म्हणाला, “जर दोघांच्या रिलेशनशिपची बातमी खरी असेल तर तुम्ही मला येऊन सांगा. आपण सोबत मिळून यावर बोलू.

https://www.instagram.com/p/B625JvXJdjH/

अथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ‘हिरो’ या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. 2015 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. अथिया नुकतीच नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत ‘मोतीचूर चकनाचूर’ सिनेमात दिसली होती.

https://www.instagram.com/p/BELTDECDewP/