‘बेबी डॉल’ सनी लिओनीला MS धोनी क्रिकेट नव्हे तर ‘या’ कारणामुळं आवडतो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट ॲक्ट्रेस सनी लिओनी ही क्रिकेटवेडी आहे हे तिच्या अनेक चाहत्यांना माहिती आहे. नुकतंच सनीनं तिला कोणता क्रिकेटर आवडतो आणि तो का आवडतो याचे कारणही सांगितलं आहे. तुम्ही कदाचित तिची आवड बघून चकितही होऊ शकता. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून तो क्रिकेटर आपल्याला मैदानात दिसत नाहीये.

सनीला जेव्हा विचारण्यात आलं की, तिचा आवडता क्रिकेटर कोण आहे तेव्हा तिनं लगेचच टीम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचं नाव घेतलं. तिनं हेही स्पष्ट केलं की, तिला माहीच का आवडतो.

माही का आवडतो हे सांगताना सनी लिओनी म्हणाली, “मला महेंद्रसिंह धोनी आवडतो कारण त्याच्याकडे खूप क्युट मुलगी आहे. तो झिवा सोबत अनेक फोटो शेअर करत असतो. दोघेही एकत्र खूपच निरागस दिसतात.”

पुढे बोलताना सनी म्हणाली, “महेंद्रसिंह धोनी माझा आवडता क्रिकेटर असण्याचं आणखी एक कारण म्हणजे तो परफेक्ट फॅमिलीमॅन आहे.”

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली आहे. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे.