Shero Teaser : ‘शेरो’ सिनेमात दिसणार ‘बेबी डॉल’ सनीचा निराळाच अंदाज ! शेअर केला टीजर

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी (Sunny Leone) अनेकदा आपल्या हॉटनेसमुळं चर्चेत येताना दिसत असते. हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याचा जणू तिचा छंदच आहे. खास बात अशी की, सनीनं फक्त फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेच तो व्हायरल होताना दिसत असतो. यावेळीही सनी चर्चेत आली आहे. परंतु याचं कारण तिचा बोल्डनेस किंवा हॉटनेस नसून काही तिचा आगामी प्रोजेक्ट आहे.

सनीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सनीच्या आगामी प्रोजेक्टची झलक पहायला मिळत आहे. लवकरच सनी शेरो (Shero) सिनेमात काम करताना दिसणार आहे. तिचा हा व्हिडीओ याच सिनेमाचा टीजर आहे. सिनेमात सनीचा बोल्ड अवतार, शानदार डान्स आणि क्युट अंदाज पहायला मिळाणार आहे. टीजरमध्ये तिच्या लुकची झलक पहायला मिळत आहे. या सिनेमात ती वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा तमिळ, हिंदी, तेलगू आणि मल्याळम अशा 4 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा एक हॉरर थ्रिलर सिनेमा आहे. सनी या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे.

सनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती हॉरर कॉमेडी सिनेमा कोका कोला, रंगीला, वीरमादेवी, हेलेन आणि कोटीगोब्बा 3 अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे. हे सर्व सिनेमे साऊथ इंडस्ट्रीतील आहेत असं समजत आहे. याशिवीाय ती एमएक्स प्लेअरवरील बुलेट्स (Bullets) या वेब सीरिजमध्येही काम करताना दिसणार आहे. आता तिच्याकडे शेरो हा सिनेमा देखील आहे. काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती.