‘बिग बी’ अभिताभचा मेट्रोला पाठिंबा, ‘आरे’तील मेट्रो कारशेडला विरोध करणार्‍यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील मेट्रो वरून आरे येथे मोठा वाद सुरु आहे. आरे मधील मेट्रो कारशेडवरून स्थानिक नागरिकांचा या प्रकल्पाला मोठा विरोध दिसून येत होता. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचं कौतुक केलं आहे.

मेट्रो सेवेच्या समर्थनार्थ अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात बच्चन यांनी मेट्रोला विरोध करणाऱ्यांना चांगलाच टोमणा मारला आहे. मेट्रो गतिशील आणि लाभदायक असल्याचे सांगण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी आपल्या मित्राने सांगितलेली घटना ट्विट केली आहे.

अमिताभ यांच्या मित्रान मेडिकल इमर्जन्सी वेळी त्याच्या कारऐवजी मेट्रो सेवेचा पर्याय निवडला. मेट्रो सुविधा सोयीस्कर असल्याचं त्यानं परतल्यानंतर सांगितलं.त्यामुळे खाजगी सेवेपेक्षा मेट्रो खूप लाभदायक असल्याचे मित्राने म्हंटले असे अमिताभ यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले.

प्रदूषणावर झाडे लावणे हाच एकमेव उपाय आहे त्यामुळे अधिकाधिक झाडे लावा असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे. मी माझ्या बागेत झाडे लावली आहेत. तुम्ही हे केलत का ? अमिताभ बच्चन यांनी मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना यावेळी अप्रत्यक्षपणे सवाल विचारलं आहे.