Supriya Sule | महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या-‘2029 च्या आधी…’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supriya Sule | महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) लोकसभेत नुकतेच पारित झालं आहे. यानंतर आता राज्यसभेत या विधेयकावर चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Group) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महिला आरक्षणाच्या अंमलबजाणीबाबत मोठं विधान केलं आहे. 2029 च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य आहे, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 2029 च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य आहे. कारण अद्याप पुनर्रचना होणं बाकी आहे. हा केवळ निवडणुकीतील ‘जुमला’ आहे. महिला आरक्षणाला आमचा पक्ष पूर्ण ताकदीने पाठिंबा देत आहे. यात ओबीसींनाही आरक्षण (OBC Reservation) असायला हवं. आरक्षण सर्वसमावेशक असावं. इतरांना मागे टाकून पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात आनंद असतो.

https://x.com/PTI_News/status/1704729564365094936?s=20

मोदी सरकारच (Modi Government) म्हणत की, ‘सबका साथ, सबका विकास’. त्यामुळे आता त्यांनी प्रयत्न करावेत
आणि सर्वांना बरोबर घ्यावं. महिला आरक्षणात प्रत्येकाचे योगदान आहे. रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या महिलांना महिला
आरक्षणामुळे निवडून येण्याची संधी मिळेल का यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे, असेही मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुढे म्हणाल्या, पुनर्रचनेचं काय होणार, जनगणनेचे काय होणार हे समजेल तेव्हाच
यासंदर्भात स्पष्टता येईल. केवळ वर्तमान पत्राच्या ‘हेडलाईन’ वरुन संपूर्ण वर्तमानपत्र वाचता येत नाही, असेही त्यांनी नमूद केलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | विसर्जन हौदाची पाहणी करताना आरोग्य कर्मचाऱ्याला वीजेचा धक्का, दोन्ही पाय जळाले; हॅपी कॉलनीतील घटना